Raj Thackeray Panvel: मनसे प्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला. मुंबई-गोवा माहामार्गाच्या कामाला २००७ साली सुरुवात झाली होती. मात्र १६ वर्ष झाले हे काम सुरुच आहे. त्यामुळे कोकणात जात असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याची दखल आता मनसेने घेतली आहे. राज ठाकरे आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, मी लांब भाषण करणार नाही. पण मी आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलो. चांद्रयाण चंद्रावर गेले पण काय फायदा झाला. तेथील खड्डेच बघायचे होते तर ते याण महाराष्ट्रात पाठवायचे होते. पैसे वाचले असते. हा काही कोकणचा भाग नाही महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची हीच परिस्थिती आहे.
हे खड्डे आज पडले नाही. २००७ ला रस्त्याचे काम सुरु झालं. अनेक सरकार आले गेले. एवढी सरकारं आले नंतर देखील त्याच पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मतदान कसे करता, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
या लोकांना धडा शिकवावा, घरी बसवा, निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा देतात. मात्र सत्तेत आल्यानंतर करु-करु करतात. अमित ठाकरे जात असताना त्यावर भाजपने टीका केली. म्हणे रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका, मला वाटते भाजपने दुसऱ्याचे आमदार न फोडता पक्ष उभा करायाला शिकलं पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.