एसटी महामंडळ "बंद'चा घाट ः तेली

Rajan Teli's allegations against the government
Rajan Teli's allegations against the government
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यातील एसटी महामंडळ बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. महामंडळातील 27 हजार कर्मचारी 50 वर्षांवरील आहेत. त्या सर्वांना निवृत्ती घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, ""सर्वसामान्यांची एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. मात्र, ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खासगी वाहतूक व्यावसायिकांच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने राज्याने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 50 वर्षांवरील 27 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्ती घेण्यास सांगितले जात आहे. एवढ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतली तर महामंडळ कधीही बंद पडू शकते.'' राज्यात कोरोना रोखण्याबाबत अजूनही शासन गंभीर नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातून मुंबईला गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात आल्यावर वेळेवर कोरोना चाचणी होत नाही. इतर प्रवाशांबरोबरच त्यांना एसटी बसमध्ये बसविले जाते. याखेरीज ग्रामीण भागातील एसटी सेवा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे एका बसमध्ये 100 प्रवासी कोंबून बसविले जातात. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे.'' 

जलक्रीडा व्यवसायाचा खेळखंडोबा 
राज्य शासनाने जलक्रीडा व्यवसायाला परवानगी दिली; तर मेरी टाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यात खो घातला. यात कर्जाच्या खाईत बुडालेले जलक्रीडा व्यावसायिक आणखी अडचणीत आले आहेत. मात्र, भाजप या व्यावसायिकांच्या पूर्ण पाठीशी असून, लवकरच बंदर विकास कार्यालयावर धडक देणार आहोत. 

"त्या' बदली रद्दने चपराक 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या बदलीसाठी पालकमंत्री आणि खासदारांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांचा शेरा घेऊन त्यांनी बदलीसाठी शिफारस केली होती. मात्र, "मॅट'ने डॉ. चव्हाण यांची बदली रद्द केल्याने पालकमंत्री आणि खासदारांना जबरदस्त चपराक मिळाली आहे, असेही श्री. तेली म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.