राजापूरच्या रिफायनरी विरोधी संघटनेचं CM ना पत्र; थेट भेटीची मागणी

मध्यस्थीला कुणीही नको, थेट भेट हवी; विरोधी संघटनेची मागणी
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackerayesakal
Updated on

रत्नागिरी: ग्रीन रिफायनरीवरून (Green Refinery) पुन्हा एकदा विरोधी संघटनांनी आवाज उठवला आहे.राजापूरच्या रिफायनरी विरोधी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी विरोधकांची बाजू मांडण्यासाठी तातडीची वेळ मागितली आहे. यासाठी मध्यस्थीला कुणीही नको, थेट भेट हवी आहे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, बारसू सोलगावच्या जागेबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लिहलेल्या पत्राबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

CM Uddhav Thackeray
NCB मुंबईच्या झोनल डायरेक्टर पदी अमित घावटेंची नियुक्ती

बारसू (ता. राजापूर) येथे रिफायनरीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राने कळवले आहे.प्रकल्पासाठी ती जागा योग्य असल्याचे केंद्राने कळवले तर, स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प हवा की नको याबात पुढील निर्णय घेतला जाईल. राज्य शासनाची आणि शिवसेनेची (Shivsena) हीच भूमिका असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

रिफायनरीला विरोधी का?

रिफायनरी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असून कोकणच्या सौंदर्यावर घाला येणार आहे. याचा परीणाम समुद्रातील प्रदूषण वाढणार असून या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे.यासाठी स्थानिकांनी मोर्चाही काढला.

CM Uddhav Thackeray
देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं, भागवतांच्या अखंड हिंदुस्तानच्या कल्पनेचं स्वागत

नाणारमधून रोजगाराची संधी

रिफायनरीच्या प्रकल्पातून जवळपास ३ लाख कोटींची गुतंवणूक अपेक्षित असून किमान लाखभर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा खेळता राहणार असून देशाच्या आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, त्यानंतर देखील स्थानिकांनी या प्रकल्पाला मोठ्या संख्येनं विरोध दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.