Rajkot Fort: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई, दोघांविरोधात गुन्हा दाखल

35- Foot Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: हा पुतळा नौदल विभागाच्या वतीने उभारण्यात आला होता. त्यामुळे या घटनेची माहिती नौदल विभागास देण्यात आली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue, Rajkot Fort, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकोट किल्ला, शिवपुतळा
35- Foot Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapses Rajkot FortSakal
Updated on

मालवण : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.