चिपळूण (रत्नागिरी) : हजरत पैगंबरांनी या महिन्याला अल्लाहचा महिना म्हणून संबोधले आहे. यावरून या महिन्याची महती लक्षात येते. रोजा, नमाज, तिलावत, जकात,दानधर्म या सर्व गोष्टींचे पालन करून पूर्ण महिना अल्लाहच्या नामस्मरणाने घराघरातील वातावरण मुग्ध झालेले असते. प्रत्येक जण जास्तीत जास्त ईश्वर आराधना करून वर्षभरातील स्वतःच्या चुकांचे पापक्षालन आणि अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी दाखवलेले सर्व सत्मार्ग अवलंबिले जातात.
अल्लाहची भीती मनात ठेवून रोजे
रोजेदाराच्या रोजाचे परिमान पुण्य रुपात किती द्यावे याची जबाबदारी साक्षात अल्लाहने घेतलेली असल्यामुळे प्रत्येक जण रोजे धरून त्याला प्रसन्न करण्यासाठी आतुर असतो. त्यासाठी 12 तास उन्हाची किंवा उष्णतेची पर्वा न करता केवळ अल्लाहची भीती मनात ठेवून रोजे धरले जातात. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी पासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो .मागील सर्व वर्षांपेक्षा यावर्षीच्या रमजान महिन्याची पार्श्वभूमी वेगळी आहे.
कोरोना सारख्या विषाणूमुळे सर्व जग जवळपास बंद झाले आहे. हजारो लोक आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत . प्रत्येक देशाला याची झळ पोहोचलेली आहे . एक अति सुक्ष्म असा विषाणू संपूर्ण जगाची व्यवस्था बदलून टाकेल हे जर तीन महिन्यापूर्वी कुणाला सांगितले असते तर कुणालाच पटले नसते . परंतु आज त्याचा अनुभव प्रत्यक्ष जग घेत आहे. सगळ्या महासत्ता त्याच्या पुढे हतबल झाल्या आहेत. या जगाला चालवणारी एक अद्भुत शक्ती आहे. तिला आम्ही अल्लाह, ईश्वर, गॉड म्हणतो. निसर्ग म्हणतो. तोच या जगाचा पालनहार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
घरात राहून अल्लाहची प्रार्थना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नमाज साठी मशिदींमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकार बरोबरच जगभरातील सर्व उलेमांनी केले आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे . कुटुंबाच्या आणि आपल्या संरक्षणासाठी सर्वांनी ही पथ्ये पाळली जात आहे. घरात राहून अल्लाहची प्रार्थना केली जात आहे. त्याची मर्जी संपादन करून हा रोग जगभरातून लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी सर्वजण मनोभावे प्रार्थना करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.