रत्नागिरी : आंबा घाटाचे काम युद्धपातळीवर

आठ कोटींचा निधी; दोन महिने लागणार, कोसळलेल्या भागाची दुरुस्ती, अतिअवजड वाहतूक बंदच
आंबा घाटाचे काम युद्धपातळीवर
आंबा घाटाचे काम युद्धपातळीवर sakal
Updated on

रत्नागिरी : जुलै महिन्यात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्‍या आंबा घाटात दरडी कोसळून रस्ता खचला होता. धोकादायक अशा तिन ठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

अतिमुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला जबरदस्त तडाखा बसला. सह्याद्रीच्या खोऱ्‍यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे यासारखे प्रकार घडले. आंबा घाटातील परिस्थिती अत्यंत गंभीर होतील. डोंगरातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर दगड-माती रस्त्यावर वाहून आली. बारा ठिकाणी असे प्रकार घडले. त्यातील तिन ठिकाणी खोल दरीच्या बाजूने अर्धा रस्ता खचला होता. त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली.

आंबा घाटाचे काम युद्धपातळीवर
राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

दगड-माती बाजूला केल्यानंतर दुचाकी, चारचाकीसाठी मार्ग खुला केला. पाऊस थांबल्यानंतर डोंगराच्या बाजूने सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधून वीस टनी वजनाच्या गाड्या घाटातून सोडण्यास सुरवात झाली. कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे याची डागडुजी लवकरात लवकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळे पावले उचलण्यात येत आहे. सध्या आंबा घाटात दरीच्या बाजूने कोसळलेल्या भाग दुरुस्त केला जात आहे.

भविष्यात पावसाळ्यामध्ये पुन्हा धोका निर्माण होऊ नये, यासाठी तळातील भागात गॅबियन प्रकारचा बंधारा टाकला जाईल. त्यावर सिमेंट काँक्रिटची भिंती बांधण्यात येणार आहे. यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम सुरू करून एक महिना पूर्ण झाला आहे. या कामासाठी भली मोठी क्रेन आणली गेली आहे. काँक्रिट टाकण्याचे काम रात्रीच्यावेळी केले जाते. संरक्षक भिंतीसह त्या भागातील दुपदरी रस्ता बांधण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मालवाहू ट्रेलरसह अति अवजड वाहतूकीला प्रतिक्षाच करावी लागणार आहे. काम सुरु असलेल्या भागात एकमार्गी वाहतूक केली जाते. पुढील पावसाळ्यात या येथील रस्ता मजबूत करण्याच्यादृष्टीने सध्या काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

आंबा घाटाचे काम युद्धपातळीवर
रत्नागिरी : निसर्गापुढे कोकणातील आंबा बागायतदार हतबल

त्या कारखानदारांना आर्थिक भूर्दंड

दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरुन जयगड बंदराकडे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात साखर आणली जाते. आंबा घाट बंद असल्याने ही वाहतूक अन्य मार्गाने केली जात असल्यामुळे संबंधित कारखानदारांना आर्थिक भूर्दंड बसला आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी कोल्हापूरमधील साखर व्यावसायिकांकडून केली जात आहे.

आंबा घाटातील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. भविष्यात पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित होईल.

- वसंत पंदेरकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

एक दृष्टिक्षेप..

  • घाटात तळातील भागात गॅबियन प्रकारचा बंधारा

  • त्यावर सिमेंट काँक्रिटची भिंती बांधण्यात येणार

  • कामास आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

  • काँक्रिट टाकण्याचे काम होते रात्रीच्यावेळी

  • संरक्षक भिंतीसह दुपदरी रस्त्यासाठी लागणार दोन महिने

  • मालवाहू ट्रेलरसह अति अवजड वाहतूक वेटींगवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.