Refinery Protest : 'त्या'नंतर रिफायनरीचा विरोध मावळला? स्थानिकांनी सांगितली जनआंदोलनाची दिशा

"माती परिक्षण ही फक्त औपचारिकता आहे, सरकारला तिथं प्रकल्प करायचाच आहे."
Refinery Protest
Refinery ProtestSakal
Updated on

बारसू-सोलगाव (रत्नागिरी) : रत्नागिरीमधील बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले असून प्रकल्पासाठी लागणारे माती परिक्षणाचे काम सध्या संपले आहे. त्यामुळे अशांत झालेला बारसू परिसर काहीसा शांत झाला आहे. माती परिक्षणानंतर पोलीस बंदोबस्त हटवण्यात असला तरीही ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे.

माती परिक्षणासाठी बारसू, धोपेश्वर, पन्हळेतर्फे राजापूर जवळपास ६७ बोअरवेल खोदले असून त्यापूर्वी नाटे परिसरामध्ये १८ ड्रील पूर्ण करण्यात आल्या होत्या. येत्या दोन महिन्यात माती परिक्षणाचा अहवाल येणार आहे. अहवालामध्ये सदर जागा प्रकल्पासाठी योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण काहीही झाले तरी हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांची आहे.

Refinery Protest
RBI Truck : 535 कोटींची रक्कम घेऊन जाणारा RBIचा ट्रक रस्त्यातच झाला खराब; लगेच जमा झाले लोकं अन्...

कोकणाला रिफायनरी नको शाश्वत विकास द्या

कोकणाला जे निसर्गाचं वैभव लाभलं आहे ते उध्वस्त करण्यापेक्षा सरकारने कोकणाच्या पर्यटनावर शाश्वत विकास करायला पाहिजे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा विकास करायला हवा. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि जैवविविधतेमुळे येथे पर्यटनासाठी अनुकूल वातावरण आहे. पण रोजगारनिर्मितीच्या नावाखाली कोकण उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय.

कोकणातल्या किती स्थानिकांना नोकऱ्या मिळणार?

या प्रकल्पामुळे एक लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. पण मुळात हे एक लाख लोकं कुठले असतील. या नोकरीसाठी जे कौशल्य आणि औद्योगिक प्रशिक्षण लागणार आहे ते येथील लोकांकडे आहे का? परराज्यातील लोकांना रोजगार देण्यात येईल आणि फक्त हमालीचं काम करण्यासाठी कोकणातील माणसाचा वापर करण्यात येईल असं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय.

Refinery Protest
Video Viral : भर मंडपात नवरीचा मूड बदलला, लग्नास दिला नकार; नवरीविनाच नवरदेव घरी

"नाणार नंतर हा प्रकल्प बारसू येथे येणार असल्याचं शेतकऱ्यांना माहिती नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. पण कोकणातील लोकांना रिफायनरी नकोच आहे, त्यामुळे सरकारसोबतच्या संवादाचा काहीच विषय येत नाही. या परिसरातील जवळपास ९५ टक्क्यापेक्षा जास्त ग्रामसभेने हा प्रकल्प नको असल्याचा ठराव घेतला तरीसुद्धा सरकारने आंदोलकांना आणि महिलांना डांबून माती परिक्षण केलं. सरकारने कोकणात रिफायनरी आणण्यापेक्षा येथील शाश्वत पर्यटनाच्या विकासाचा विचार करायला पाहिजे."

- संजय परब (बारसू परिसरातील रहिवाशी, ज्येष्ठ पत्रकार आणि जनता दल सेक्युलरचे प्रदेश चिटणीस)

"सध्या आंदोलनाची तीव्रता जरी कमी असली तरी अहवालानंतर होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठका आणि नियोजन सुरू आहे. मुंबईत आणि बारसू परिसरात पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणे सुरू आहे. त्याचबरोबर काही सड्यांवर नव्याने कातळशिल्प आढळून आले आहेत. त्याचे लोकल पातळीवर मॅपिंग करण्याचेही काम सुरू आहे. माती परिक्षण ही फक्त औपचारिकता आहे, सरकारला तिथे प्रकल्प करायचाच आहे पण या प्रकल्पाला असलेला आमचा विरोध कायम असणार आहे वेळ आली तर आम्ही जनआंदोलन करू"

- पंकज दळवी (आंदोलक, स्थानिक रहिवाशी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.