अभ्युद्यनगर येथे महिलेला घरात घुसून मारहाण

गोळी घालून ठार करण्याची धमकी; चौघांवर गुन्हा
Ratnagiri crime against woman was beaten in house
Ratnagiri crime against woman was beaten in house sakal
Updated on

रत्नागिरी : शहरातील अभ्युद्यनगर येथे घराच्या काचा फोडून घरात शिरून महिलेला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. बंदुकीची गोळी घालून ठार करू, अशी धमकीही त्या महिलेला आणि तिच्या मुलाला देण्यात आली. काल (ता. १४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता हनुमंत यादव (३५, रा. खेडेकर यांच्या घराजवळ अभ्युद्यनगर, नाचणे रोड, रत्नागिरी) असे तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव आहे. ममता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि चक्कर येत असल्याने त्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी जगन्नाथ खेडेकर, त्यांचा मुलगा, पत्नी व सून (पूर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. अभ्युद्यनगर, नाचणे रोड रत्नागिरी) हे संशयित तेथे आले. दरवाजा जोरजोरात काठीने ठोठावू लागले व त्यांनी काठीने खिडकीच्या काचा आणि मीटर फोडले. त्यानंतर ते दार उघडा, असे ओरडत होते. काय प्रकार सुरू आहे, काय झाले हे पाहण्यासाठी ममता यांनी दार उघडले.

एवढ्यात खेडेकर त्यांच्या घरात शिरले आणि ममताच्या मुलाला मारण्यासाठी काठी उगारली आणि जीव घेतो, अशी धमकी दिली. यावेळी ममता त्याला वाचविण्यासाठी पुढे गेल्या असता खिडकीच्या फुटलेल्या काचेने खेडेकर यांनी ममता यांना मारले. यामध्ये त्या जखमी झाल्या. या मारहाणीत संशयितांनी बंदुकीची गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ममता यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.