रत्नागिरी : उदय सामंत यांच्या हस्तेच शासकीय ध्वजवंदन होणार

विधिमंडळ समितीवर सामंतांची निवड
उदय सामंत
उदय सामंतsakal
Updated on

रत्नागिरी : मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेले उदय सामंत यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान आणखी मजबूत झाले आहे. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवड केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक महत्त्वाचापान मंत्री म्हणून उदय सामंत यांना महाराष्ट्र ओळखू लागला आहे.

शिवसेनेत राजकीय भूकंप झाल्यानतंर सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि या सर्व घडामोडी घडत गेल्या. अल्पावधीत त्यांना उपनेते आणि नंतर प्रवक्तेपद देण्यात आले. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाची ही सर्वात महत्त्वाची समिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याची या समितीवर निवड केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.