रत्नागिरी : बचतगटाचा माल आखातात; दुबई संपर्काने प्रगती वेगात

मुमकेतील बचत गट; २००६ पासून चढता आलेख
 बचतगटाचा माल आखातात
बचतगटाचा माल आखातातsakal
Updated on

खेड : प्रयत्नार्थी परमेश्‍वर ही उक्ती उत्तम लागू होते, ती तालुक्यातील मुमके येथील केदारनाथ बचत गटाला. या गटातील महिलांनी शेळीपालन, दुग्धव्यवसाय, रेशनदुकान, कडधान्य शेती, औषधी वनस्पतीची नर्सरी, कपड्यांचे दुकान, पापड उद्योग असे विविध व्यवसाय करून आपली उन्नत्ती साधली आहे. मुमकेतील या केदारनाथ बचतगटाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. तेव्हापासून याचा आलेख उंचावलेलाच आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून या गटातील महिलांना एक नवी दिशा मिळाली. या गटाची स्थापना केली, त्या वेळी प्रत्येक महिलेच्या डोक्यात व्यवसायाची वेगवेगळी संकल्पना होती. त्या दृष्टीने त्या महिलांनी प्रयत्न केले.त्यामुळे खेड येथील आयडीबीआयच्या शाखेने या गटाला १० लाखांचे कर्ज दिले. मुमके हे गाव तालुक्याच्या खाडीपट्ट्यालगत वसलेले आहे. खाडीपट्टा नारळी, पोफळीच्या बागांनी संपन्न असून, उन्हाळी शेतीही होते. बारमाही पाणी आणि सुपिक जमीन यामुळे शेती उत्तम होते. त्यामुळे या महिलांनी कडधान्य शेती आणि फळभाज्यांची लागवड केली. एका व्यवसायावर अवलंबून न राहता या महिलांनी शेळीपालनासह औषधी वनस्पतींची नर्सरीदेखील तयार केली होती. त्या वेळी या महिलांना लोटे येथील श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक सुरेश पाटणकर यांचेदेखील उत्तम सहकार्य मिळाल्याची आठवण या महिलांनी ''सकाळ''ला सांगितली.

गावातील बरीच लोक कुटुंबासह आखाती देशात..

सद्यःस्थितीत गावातील रेशन दुकान आणि कपड्याचे दुकान व दुग्ध व्यवसायातूनदेखील या महिला चांगले उत्पन्न घेत आहेत. गटातील प्रत्येक महिला खऱ्‍या अर्थांने व्यवसायातून सक्षम झाल्याची भावना गटाच्या अध्यक्ष प्रतिमा सालेकर यांनी बोलून दाखवली. मुमकेतील बहुतांश लोक हे नोकरी व्यवसायानिमित्ताने कुटुंबासह आखाती देशात असल्याकारणाने आपसूकच गटाच्या माध्यमातून तयार केलेले पापड, विविध कडधान्य-डाळी, लोणची व मसाले हे थेट आखाती देशात जातात.

महिलांची खरी मेहनत

लोकसंचालित साधन केंद्राच्या साह्याने या महिलांनी ग्रामीण भागात देखील उत्पन्नाचा एक चांगला मार्ग मिळाला असे मुमकेचे उपसरपंच दाऊद दुदूके यांनी सांगितले. या महिलांचीदेखील यामागे खरी मेहनत असून, त्यांच्या या व्यवसायामुळे कुटुंबाला हातभार लागत आहे, असे दुदूके यांनी सांगितले.

आमच्या गावात तयार झालेले पदार्थ, पिकवण्यात आलेले कडधान्य याचा एक वेगळाच स्वाद आहे. त्यामुळे आम्ही गावी सुट्टीसाठी आल्यावर हे सारे खरेदी करून परदेशात जाताना आवडीने घेऊन जातो,

-सुरैय्या अब्दुलअजिज फकी, सध्या रा. दुबई

बचतगटाने आमचा आर्थिक स्तर उंचावला आहे. ग्रामीण भागातील या खाडीपट्ट्यात आम्ही असे व्यवसाय करू, असे आम्हाला कधी वाटलेच नव्हते; परंतु माविमच्या माध्यमातून हे सारे शक्य झाले आहे. आम्हाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‍या एसबीआय, आयसीआयसीआय व आयडीबीआय या बॅंकांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत.

आरती सालेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.