Ratnagiri Hapus Mango : 'हापूस'च्या 480 पेट्या वाशी बाजारात दाखल; चार-पाच डझनला 6 ते 11 हजार रुपये दर

सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारी एकाच दिवशी ४० हून अधिक पेट्या पाठवल्या आहेत.
Ratnagiri Hapus Mango
Ratnagiri Hapus Mangoesakal
Updated on
Summary

बाणकोट आणि श्रीवर्धनमधूनही आंबा पाठवला जात आहे. दापोली, संगमेश्‍वर, राजापूरमधून किरकोळ आंबा वाशीमध्ये जात आहे.

रत्नागिरी : नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये (Vashi Market Committee) कोकणातील (Konkan) हापूस आंबा (Hapus Mango) दाखल झाला आहे. सोमवारी (ता. २९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन येथून सुमारे ३८० पेट्या दाखल झाल्या. मंगळवारी (ता. ३०) शंभर पेटी आल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक पेट्या देवगडमधील (Devgad) असून त्या पोठपाठ रत्नागिरी, दापोली, बाणकोटमधील पेट्या आहेत.

चार व पाच डझनच्या पेटीला ६ ते ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा सुरुवातीला हापूससाठी पोषक वातावरण होते; मात्र जानेवारीत पडलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला

Ratnagiri Hapus Mango
National Highway : 'या' नव्या राष्ट्रीय महामार्गामुळं महापुराचा धोका; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

त्यामुळे पहिल्या टप्प्यात लागलेल्या मोहोरामधील उत्पादन कमी येत आहे. जानेवारीच्या सुरवातीला रत्नागिरीमधून पहिली पेटी वाशी बाजारात रवाना झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारी एकाच दिवशी ४० हून अधिक पेट्या पाठवल्या आहेत. बाणकोट आणि श्रीवर्धनमधूनही आंबा पाठवला जात आहे. दापोली, संगमेश्‍वर, राजापूरमधून किरकोळ आंबा वाशीमध्ये जात आहे.

Ratnagiri Hapus Mango
Kolhapur Madrasa : 'लक्षतीर्थ'मधील विवादित मदरसा इमारत मुस्लिम समाज उतरवून घेणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सर्वाधिक देवगडमधून सुमारे २५० पेटी आंबा सोमवारी बाजारात पोहचला. रत्नागिरी जिल्ह्यातून पेट्यांचे प्रमाण कमी असले तरीही १५ फेब्रुवारीनंतर यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा वाशीमधील व्यावसायिक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘सध्या कोकणातून किरकोळ हापूस येत आहे. त्याची विक्री सुरू आहे. दरही चांगला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे.’

मुंबई, पुण्यासह अहमदाबादला हापूस

राजापूर : अपेक्षेपेक्षा थंडीचे कमी प्रमाण आणि अवकाळी पाऊस यातून हंगामाच्या सुरुवातीपासून सातत्याने प्रतिकूल वातावरण असूनही तालुक्यातील बागांमध्ये दर्जेदार हापूस आंबा तयार झाला आहे. अवकाळी पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव आणि फळगळती होऊनही यावर्षी फळधारणा चांगली असून, फळाचा आकारही गतवर्षीपेक्षा किंचित मोठा आहे.

बागांमध्ये परिपक्व झालेल्या फळांची तोडणी सुरू झाली असून, आंबा विक्रीसाठी मुंबई-पुणे-अहमदाबादसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये दाखल होऊ लागला आहे. तालुक्यातील भू येथील युवा आंबा बागायतदार विशाल सरफरे यांच्या बागेमध्ये तयार झालेल्या हापूसच्या दोन पेट्या विक्रीसाठी मुंबई आणि गुजरात येथील अहमदाबाद येथे रवाना झाल्या. हंगामाच्या सुरवातीला नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये अपेक्षित थंडीचे वातावरण नव्हते.

Ratnagiri Hapus Mango
आई-वडिलांच्या किडन्यांमुळं मुलांना मिळालं जीवदान; कृष्णा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

त्यामुळे मोहोराचे प्रमाण कमी होते; मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी पडू लागल्याने मोहोर आणि फळधारणा चांगली झाली; मात्र नंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे फळगळती होऊन नुकसान झाले. काही बागांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाला. आता पुन्हा हवामान स्वच्छ झाले असून, चांगली थंडी पडू लागली आहे. त्यामुळे बागांमध्ये हापूस आंबा परिपक्व झाला असून, त्याची तोडणी सुरू झाली आहे.

Ratnagiri Hapus Mango
कोकणातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित'; शासनाकडून मोठी घोषणा, 175 गावांत 2 हजारांहून अधिक कातळखोद चित्रांची नोंद

सुरवातीच्या टप्प्यातील मोहोरामधून किरकोळ उत्पादन सध्या मिळत आहे. मधल्या कालावधीत दुबार मोहोर आल्यामुळे सुरवातीची कैरी गळून गेली. सध्या चार ते पाच पेटी आंबा मिळतो. तो काढून वाशी बाजारात पाठवण्यात येत आहे. हा आंबा अजून पंधरा दिवस मिळेल. त्यानंतर पुन्हा मार्चअखेरीस मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात जाण्यास सुरवात होईल.

-रूपेश शितप, आंबा बागायतदार, करबुडे, ता. रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.