विनाकारण फिरणा-यांवर आता 'ड्रोन' कॅमे-याची तिसरी नजर

विनाकारण फिरणा-यांवर आता 'ड्रोन' कॅमे-याची तिसरी नजर
Updated on

रत्नागिरी: जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने (police system)लॉकडाउनची (Ratnagiri Lockdoen) कडक अंमलबजवाणी सुरू केली आहे. पोलिस बंदोबस्त, तपासणी नाक्यांबरोबर आता ड्रोन कॅमेराचीही (Drone camera) तिसरी नजर विनाकारण फिरणा-यांवर राहणार आहे. शहराची व्याप्ती मोठी असल्याने काल पोलिस दलाने शहरात ठिकठिकाणी ड्रोन कॅमे-याने बारीक लक्ष ठेवले. जिल्ह्यात आज दुस-या दिवशी लॉकडाउनची कडक अंमलबजवणी जिल्ह्यात सुरू आहे. ratnagiri-lockdown-update-kokan-marathi-news

पोलिसांनी ५७ तपासणी नाके उभारले आहेत. प्रत्येक शहरांमध्ये २ ते ३ नाके आहेत. व्हाॅरेंटिअर आणि होमगार्डनांही मदतीला घेतले आहे. त्यामुळे रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी नाक्यावर तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा, इ-पास असणाऱ्यानांच परवानगी दिली जात आहे. विनाकारण फिरणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिस प्रभावी अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहेत. मात्र मर्यादीत मनुष्यबळामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहे. त्यावर देखील पोलिस दलाने पर्याय शोधला आहे.

पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याची तिसरी नजर विनाकारण फिरणाऱ्यावर ठेवली आहे. कालपासून या ड्रोन कॅमे-याचा वापर पोलिस दल करत आहेत. एका ठिकाणी थांबून आजू-बाजूच्या परिसरामध्ये विनाकारण कोण रस्त्यावर फिरत आहे का, हे पाहिले जाते. कोणी दिसल्यास तत्काळ पोलिस कर्मचाऱ्ंयाना त्या ठिकाणी पाठवून कारवाई केली जाते. मात्र काल ही वेळ आली नाही. परंतु लॉकडाउनच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी पोलिसांनी आवश्यकतेनुसार तिसरा डोळा म्हणून ड्रोन चा वापर सुरू केला आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.