रत्नागिरी : रघुवीर घाट; धोकादायक वाट!

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, आपत्कालीन यंत्रणेची गरज
धोकादायक वाट
धोकादायक वाटsakal
Updated on

खेड : रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कादांटी खोऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाकडे गेल्या वर्षभरात पूर्णपणे लक्ष देणे सार्वजनिक बांधकाम विभागाला जमलेले नाही. परिणामी गतवर्षीच्या अतिवृष्टीत ढासळू लागलेल्या या घाटातील वाहतूक यंदा सुरक्षित सुरू ठेवण्याचे आव्हान यावर्षी पावसाळ्यात प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कादांटी खोऱ्यातील अनेक गावांना पावसाळ्यात शहराशी जोडणारा हा घाट आहे. मात्र, गतवर्षी घाटाची झालेली पडझड अद्याप पूर्णपणे दुरुस्त झालेली नसल्याने स्थानिक ग्रामस्थ चिंतेत आहेत.

खेड तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणारा रघुवीर घाट निसर्गरम्य ठिकाण असून, कादांटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, मोरणी, अकल्पेसह २१ गावांमध्ये पोहोचण्यासाठी दळणवळणाचे हे एकमेव माध्यम आहे. खोपी व शिरगाव या खेड तालुक्यातील दोन गावांतील काही वाड्या या घाटामुळे शहराशी जोडल्या गेल्या आहेत. हा घाट अवघड व अनेक ठिकाणी पान ४ वर

ढासळू लागल्याने धोकादायक बनला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमध्ये घाटात अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या कड्यातून पाण्यासोबत दगड व माती ढासळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपी गावातून सुरू होणाऱ्या या घाटातील दहा कि.मी. परिसरातील रस्त्यावर काही ठिकाणी काम केले असले तरी अद्याप घाटात अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यात या घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो; मात्र त्यासाठी घाटातील वाहतूक योग्य राखणे आवश्यक आहे.

अतिवृष्टी झाल्यास..

घाटातून दररोज कादांटी खोऱ्यातील अनेक लोक दैनंदिन कामासाठी खेडमध्ये ये-जा करत असल्याने त्यांचीदेखील पावसाळ्यात गैरसोय होऊ नये, म्हणून बांधकाम विभाग व प्रशासनाने आवश्यक यंत्रणा घाट परिसरात किमान पावसाळ्याचे चार महिने तैनात ठेवणे आवश्यक आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यास घाटातील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

खेड तालुक्यातील रघुवीर घाट आमच्या खोपी गावासह कादांटी खोऱ्यातील गावातील लोकांसाठी महत्त्वाचा घाट आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक येत असल्याने आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. तर कांदाटी खोऱ्यातील लोकांचा जगाशी संपर्क राहतो. सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने छोटी-मोठी कामे करून घ्यावीत व नैसर्गिक आपत्तीचा सामना करत घाट सुरू ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा घाटात ठेवावी.

आम्हाला रघुवीर घाट हाच एक पर्याय आहे. औषधोपचारासह अन्य सर्वच जीवनावश्यक बाबतीत आम्ही खेड तालुक्यावर अवलंबून आहोत. तरी दरवर्षी पावसाळ्यात रघुवीर घाटात दरड कोसळून आमचा जगाशीच संपर्क तुटतो. त्यामुळे हा रस्ता सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

- सदानंद मोरे, शिंदी वळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.