Chiplun Flood : रत्नागिरीत पावसाचं रौद्ररुप! चिपळूण, खेडला पुराचा वेढा; परशुराम, कुंभार्ली घाटात कोसळल्या दरडी

मुसळधार पावसाने जिल्ह्याला (Chiplun Flood) चांगलेच झोडपून काढले.
Chiplun Flood
Chiplun Floodesakal
Updated on
Summary

रत्नागिरी आगारातून सोडण्यात येणाऱ्‍या मुंबई मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

खेड/चिपळूण : मुसळधार पावसाने जिल्ह्याला (Chiplun Flood) चांगलेच झोडपून काढले. जगबुडी, वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा खेड, चिपळूण शहराला वेढा पडला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

परशुराम, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने, तर आरवली येथे गडनदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक एकेरी सुरू ठेवली. नदीकिनारी, दरडग्रस्त परिसरातील सुमारे ३९५ लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. राजापुरातील कोदवली, संगमेश्वरातील गडनदीलाही पूर आल्यामुळे किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Chiplun Flood
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी, लांजा, मंडणगड, गुहागर या चार तालुक्यांत दिवसभर संततधार सुरू होती. खेड, चिपळुणातील पूरस्थितीमुळे तालुक्यातील सर्व शाळांना सुटी देण्यात आली होती. पावसाचा जोर अजून दोन दिवस राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर दिवसभर कायम होता. त्यामुळे दिवसभर पूरस्थितीचा धोका कायम होता. जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत दिवसभर पाणी होते. जगबुडीच्या किनाऱ्यावर असलेल्या झोपडपट्टीमधील लोकांना मुकादम हायस्कूलमध्ये स्थलांतरित केले. जगबुडी नदीचे पाणी भोस्ते रस्त्यावर आल्यामुळे अलसुरे मार्गावरील वाहतूक बंद होती.

महामार्गावरील बोरघर कातकरीवस्ती येथील ४ घरांना पुराचे पाणी लागल्याने २२ लोकांना, तर खारी गावातील ४ कुटुंबांचे स्थलांतरित केले. नारंगी नदीचे पाणी कन्या शाळेजवळ आल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला. आंबवली-धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे खेड आगराच्या ४५ बसफेऱ्या रद्द केल्या.

तळवट ते गुड्याचा आड येथील पुलावरून पाणी जात असल्याने धामणंदकडे जाणारी, तर मातीचा भराव रस्त्यावर आल्यामुळे तुळशी-घुंबरवाडी मार्गांवरील वाहतूक बंद केली गेली. दहिवली-गावठाण येथील कोकमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीचा भराव आला होता.

Chiplun Flood
Rain Update : धो धो पाऊस पडताच लाईटीची सुरु झाली बोंबाबोंब; 'हेस्कॉम'कडं 100 हून अधिक तक्रारी

चिपळूण शहराला वाशिष्ठीच्या पुराच्या भीतीने नागरिकांनी आपली वाहने महामार्गावर काँक्रिट रस्त्याशेजारी आणून ठेवली होती. शहरातील बाजरपेठ, मुरादपूर, शंकरवाडी, चिंचनाका, आदी ठिकाणी दिवसभर पुराचे पाणी भरले होते. सायंकाळी पावसाचा जोर काहींसा कमी झाला होता. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्रीपासूनच दक्षता बाळगून होते.

बुधवारी दुपारी दोन वेळा भोंगा वाजवून दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. चिपळूण शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सायंकाळी दरड कोसळली, तर कुंभार्ली घाटामध्ये दोन वेळा दरड कोसळली. त्यामुळे परशुरामसह कुंभार्ली घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परशुराम घाटात दुपारी दरड कोसळली. एक मोठा दगड वाहतूक सुरू असलेल्या लेनवर आला.

Chiplun Flood
Thane Rain Update : उल्हास, काळू नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ; 'या' नदीनं गाठली धोका पातळी, गावांना सतर्कतेचा इशारा

त्यानंतर दरड हटवण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर घाटातील वाहतूक एकेरी सुरू होती. तसेच कुंभार्ली घाटात चोवीस तासात दोन वेळा दरड कोसळली. मंगळवारी रात्री घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी यंत्रणा पाठवून ही दरड हटवली व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पुन्हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उशिरापर्यंत दरड काढण्याचे काम सुरू होते. कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असून, दोन्ही नद्यांनी पात्र सोडून राजापुरात प्रवेश केला आहे. शहरातील मच्छीमार्केट परिसरासह वरचीपेठ रस्ता, शिवाजी पथ रस्ता, गणेशघाट परिसर पाण्याखाली गेला. तर सायंकाळी गडनदीचे पाणी संगमेश्वर बाजारपेठेत शिरू लागले होते.

Chiplun Flood
Ratnagiri Rain Update : महाबळेश्‍वरच्या पावसामुळं 'जगबुडी'नं गाठली इशारा पातळी; किनारपट्टी भागात समुद्रही खवळला

मुंबई मार्गावरील एसटी रद्द

रत्नागिरी आगारातून सोडण्यात येणाऱ्‍या मुंबई मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक एकेरी चालू झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहतूक सुरू केली गेली; परंतु दिवसभरात १२ फेऱ्‍या रद्द केल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात शाळा, महाविद्यालये सुरू असल्यामुळे वाहतूक सुरळीत होती.

सलग दोन दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले असून पूरस्थिती निर्माण झाली. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. खेडमधील जगबुडी नदीच्या काठावरील काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

- एम. देवेंदरसिंह, जिल्हाधिकारी

Chiplun Flood
Chiplun Flood Update : चिपळूणात पूरस्थिती; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, दिले 'हे' स्पष्ट आदेश

जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरात चिपळूण आणि परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मंगळवार रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर संभाव्य पुराने धडकी भरली होती. पुन्हा पुराने नुकसान होऊ नये, यासाठी काही ठिकाणी तळमजला वर राहणारे लोक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात व्यस्त होते. सायंकाळीं पावसाचा जोर वाढल्याने लोक पुन्हा काळजित पडले होते.

-विलास शेटकर, खेर्डी

रुग्णाला पोहोचविले बोटीतून हॉस्पिटलमध्ये

चिपळूण खेर्डी परिसरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले होते. चिपळूण कऱ्हाड मार्गावरील बहादूरशेखनाका ते खेर्डी बाजारपेठ दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी भरले होते. खेर्डी माळेवाडी येथील विजय तावडे यांची आई विमल तावडे यांना घरामध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता.

त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचे मार्ग पाण्याने पूर्ण बंद असल्यामुळे, खेर्डी माळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी बोटीतून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, मंडल अधिकारी उत्तम जाधव, तलाठी व इतर माळेवाडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले आहे.

Chiplun Flood
Rangana Fort : सर्वत्र दमदार पाऊस, ना खायला अन्न ना प्यायला पाणी; रांगणा किल्ल्यावर रात्रभर अडकले 16 पर्यटक

दिवसभरात

  • राजापुरातील कोदवली, संगमेश्वरातील गडनदीला पूर

  • परशुराम, कुंभार्ली घाटात कोसळली दरड

  • दोन दिवस पावसाचा जोर कायम

  • प्रशासनाकडून सतर्कता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.