नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. वाशिष्ठी नदीलाही पूर आला आहे. शास्त्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्याला (Ratnagiri Rain Update) पावसाने दाणादाण उडवून दिली. चिपळूण, खेड, राजापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही नद्यांनी इशारापातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat) दरड कोसळली.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, नेवरे, सोमेश्वर आदी गावांना फटका बसला. काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित केले. केळ्ये येथे रस्त्यावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता. अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले होते.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मोसमी पावसाची जिल्ह्यात दमदार बॅटिंग सुरू आहे. कालपासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे, तर काहींनी इशारा पातळी ओलांडली आहे. २४ तासांत चिपळूण तालुक्यात सर्वाधिक १७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तर, जिल्ह्यात सरासरी १०९.७८ मि.मी. पाऊस झाला असून एकूण ९८८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. खेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, जगबुडीसह नारिंगी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरावर पुराची टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. वाशिष्ठी नदीलाही पूर आला आहे. शास्त्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सोनवी नदी, काजळी नदी, कोदवली नदी, मुचकुंदी नदी, बावनदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे कुंभारील घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली.
मात्र, तत्काळ दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडेत एका घरात पाणी शिरले. त्यामुळे ४ लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोमेश्वरला नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तेथील बाजारपेठेत पाणी भरले होते. केळ्ये येथे पुलावरून नदीचे पाणी गेल्याने संपर्क तुटला होता.
सोमगंगा नदीला पूर आल्यामुळे नेवरे गावात पाणी भरले होते. शंभरहून अधिक लोकांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली.
दिवसभरात तालुक्यात सर्वाधिक पाऊस चिपळुणात १७३ मिलिमीटर एवढी नोंद झाली. उर्वरित तालुक्यांतील पावसाची आकडेवारी अशी (कंसातील आकडे एकूण पाऊस) ः मंडणगड १०६ (२२४८), दापोली १४६ (२४१३), खेड ९२ (१६१८), गुहागर ११२ (१३३५), चिपळूण १७३ (२०६१), संगमेश्वर १०२ (१८०३), रत्नागिरी ८५ (१३११), लांजा ८८ (१८९४), राजापूर ८४ (२००३) असा पाऊस झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.