Ratnagiri Rain Update : महाबळेश्‍वरच्या पावसामुळं 'जगबुडी'नं गाठली इशारा पातळी; किनारपट्टी भागात समुद्रही खवळला

खेड शहरासह (Khed) तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली.
Ratnagiri Rain Update Jagbudi River
Ratnagiri Rain Update Jagbudi Riveresakal
Updated on
Summary

महाबळेश्वरला पडत असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

खेड : खेड शहरासह (Khed) तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. महाबळेश्‍वरला पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीने (Jagbudi River) इशारा पातळी गाठली आहे. अन्य तालुक्यात सरींचा पाऊस सुरु होता.

किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३९.२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

त्यात मंडणगड ७०, दापोली ३४.४०, खेड ५७.४०, गुहागर २१.७०, चिपळूण ३८.९०, संगमेश्‍वर ४४.९०, रत्नागिरी १७.९०, लांजा ३१.१०, राजापूर ३६.५० मिमी पाऊस झाला. खेड तालुक्यात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आत्तापर्यंत ९९० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Ratnagiri Rain Update Jagbudi River
Rain Update : सोलापुरात Non Stop सलग 22 तास धुवांधार; बळीराजा खूश, खरिपाच्या पिकांना मिळणार जीवदान

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. काल सकाळपासूनच संततधार सुरू होती. त्यामुळे भरणे येथे बाजारहाटासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांचीदेखील पावसाने तारांबळ उडाली होती. पावसाची संततधार सुरू असून मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या जगबुडी नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.

Ratnagiri Rain Update Jagbudi River
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

महाबळेश्वरला पडत असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधारेमुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागासह शहरात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. महावितरणचे कर्मचारी तत्काळ तो पुरवठा सुरळीत करत आहेत.

Ratnagiri Rain Update Jagbudi River
Thane Rain Update : उल्हास, काळू नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ; 'या' नदीनं गाठली धोका पातळी, गावांना सतर्कतेचा इशारा

शेतकरी लावणीची कामे उरकण्यात दंग आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत होता. पेरणी करूनदेखील पिकांना पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली होती तर काही ठिकाणी उगवलेल्या भातरोपाची लावणी करण्याची कामे अडकून पडली होती.या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.