Kokan : रेवस रेड्डी महामार्ग होणार कधी?

कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे; रेवस करंजा पुलासाठी ८९८ कोटींची तरतूद
Ratnagiri
Ratnagirisakal
Updated on

रत्नागिरी : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडण्याचे स्वप्न लवकरच सत्यात येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रलंबित रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल अखेर मार्गी लागला; परंतु रेवस रेड्डी महामार्ग कधी होणार, असा सवाल कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी केला.

त्यांनी सांगितले की, रस्ते विकास महामंडळ या रेवस-करंजा पुलावर ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. रेवस आणि करंजाला जोडणारा चारपदरी खाडी पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तो पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची खूप बचत होणार आहे. या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे. यात अलिबाग आणि नवी मुंबई व मुंबईचे अंतर कमी होऊन यात प्रवाशांचा वेळ, पैसा, श्रम याच्यासह प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे.

४२ खाडयांनी व्यापलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या कोकणपट्टीतून जाणारा ५४० किमीचा रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे सध्याचे अंतर १०५ किमीने कमी होऊन प्रवासाची वेळ किमान १ ते दीड तासांनी कमी होईल. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे व किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. आंबा उत्पादन व मत्स्यव्यवसायाला अधिक गती मिळेल. राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने सागरी महामार्गाचे महत्त्व अधिक आहे.

दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड व दाभोळ हे पूल नाबार्डकडे प्रस्तावित आहेत. वेशवी, बाणकोट - बागंमांडला पूल २०१३ साली नाबार्डकडून अर्थसहाय्य मिळून देखील रखडला आहे. कोणत्याही परिस्थितीत या पुलांना फेरीबोट हा पर्याय होऊ शकत नाही. राष्ट्रीय महामार्गावर कधीही फेरीबोट बांधत नाहीत. त्याचप्रमाणे या जेटींवर तराफ्याची वाट पाहण्यात अर्धा-एक तास खर्ची पडतात. किरकोळ अपवाद वगळता सागरी महामार्ग किनारपट्टीनेच गेला पाहिजे, अशी अपेक्षा अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.