रत्नागिरी : प्रवास योजनेतून स्वबळाची तयारी

रिफायनरीचा प्रश्नही सोडविणार, केंद्रीय गृहराज्यमंत्री
kokan
kokansakal
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील १६ लोकसभा मतदार संघात विकासात्मक आणि संघटनात्मक स्थिती मजबुतीसाठी भाजपने लोकसभा प्रवासयोजनेचे नियोजन केले आहे. रत्नागिरीत ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार हे मतदार संघातील सर्व घटकांचा आणि विकासात्मक कामांचा आढावा घेणार आहे. याद्वारे भाजपने आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी केली असून या सर्व मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास राज्याचे प्रभारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी खासदार भाजपा सचिव नीलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, राजन तेली, बाळ माने आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने चारशेपारचे लक्ष्य ठेवून आहे. त्यासाठी राज्यातील १६ मतदार संघात १८ महिने प्रवासयोजना सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमले असून ते तीन दिवस मतदार संघात मुक्काम करतील. त्या वेळी स्थानिक मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्‍यांशी संवाद साधणार आहेत. मतदार संघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत होईल. बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी, मतदार संघातील स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेतली जाणार आहे.

सध्या २०-२० ची मॅच सुरू

ते म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षात राज्यातीलमहाविकास आघाडीने पहिल्या ३२ दिवसांमध्ये ० काम केले; मात्र शिंदे-फडणवीस युती सरकारने ३२ दिवसांत ३२ चांगले निर्णय घेऊन कामाचा धडाका लावला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. सध्या २०-२० ची मॅच सुरू आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये हे सरकार इतके चांगलं काम करेल की, महाविकास आघाडीच्या आमदारांना पुन्हा आपल्या मतदार संघांमध्ये स्थानिक जनता उभं राहण्याची भीती वाटेल.

एक नजर..

लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने चारशेपारचे लक्ष्य

राज्यातील १६ मतदारसंघात १८ महिने प्रवासयोजना सुरू राहणार

सहा केंद्रीय मंत्री नेमले; तीन दिवस मतदारसंघात करतील मुक्काम

मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्‍यांशी संवादही

संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडित कार्यक्रम होणार

बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी, मतदार संघातील स्वातंत्र्यसैनिकांची भेट

योजना सामान्यांपर्यंत पोहोचली का?

भविष्यात एनडीए म्हणून निवडणूक लढवताना जागावाटपात यातील काही जागा गेल्या तरीसुद्धा सहयोगी पक्षाच्या पाठीशी त्या ठिकाणी भाजप भक्कमपणे उभा राहणार आहे. प्रवासी योजनेद्वारे केंद्रात स्थानिक प्रशासनाने केंद्रातील योजना मतदारसंघात राबवल्या, त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला का, याचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे. राजापुरातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रश्नही याच प्रवासयोजनेच्या वेळेस सोडवला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

....तर निवडणुका जानेवारीत

महाविकास आघाडी सरकारने २०२१ च्या जनगणनेचा वापर न करताच बेकायदेशीररित्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिकांमधील जागा वाढवल्या आहेत. या विरोधात आम्ही गेलो असून, निकाल आमच्या बाजूने लागला तर वाढीव जागा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होतील, अशी शक्यता प्रभारी आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()