रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मुख्य आपटातिठा मार्गावरील अर्धवट अवस्थेत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे लाकडी खांब रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होते. अंगारकीनिमित्त मंगळवारी (ता. १३) गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते खांब तत्काळ हटवण्यात आले आहेत.
तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. त्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत नियोजन करत आहेत. गणपतीपुळे मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य आपटातिठा मार्गावरील सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे लाकडी खांब ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ते लाकडी खांब तत्काळ हटवण्याचे मुख्य काम गणपतीपुळे ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनवटकर आणि पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन ऊर्फ आबा पाटील, गणपतीपुळेत शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने हटवण्यात आले आहेत.
श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील आपटातिठा मार्गावर सध्या स्वागत कमान करण्याचे काम सुरू असल्यामुळे येणार्या भाविक व पर्यटकांची वाहने कमानीच्या बाहेरील पर्यायी मार्गाने ये-जा करत करतात. तसेच इतर सर्वच वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग केलेला असताना अंगारकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता दोन्ही मार्गांनी वाहतूक सुरळीत चालू राहता यावी आणि वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.