लोकसभेत विजय मिळवूनही राणेंच्या अडचणी वाढल्या; भाजप खासदाराची थेट निवडणूक आयोगाकडं तक्रार, काय आहे कारण?

राणे यांचा मुलगा आमदार नीतेश यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Narayan Rane
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Narayan Raneesakal
Updated on
Summary

प्रचार संपलेला असतानाही राणे समर्थक ईव्हीएम मशीन दाखवून राणे यांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.

मुंबई : लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg Constituency) नारायण तातू राणे (Narayan Rane) यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर पाच वर्षे निवडणूक लढविणे, तसेच मतदान करण्यापासून बंदी घालावी, अशी कायदेशीर नोटीस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निवडणूक आयोगाला( Election Commission) पाठविली आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक, अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे, की निवडणूक प्रचार ५ मे रोजी संपला असतानाही भाजप कार्यकर्ते ६ मे रोजी राणे यांचा प्रचार करीत होते. प्रचार संपलेला असतानाही राणे समर्थक ईव्हीएम मशीन दाखवून राणे यांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Narayan Rane
Sangli Politics : 'मला टोकाला जायला लावू नका..'; जयंत पाटील समर्थकांची रील्स, खासदार अन् आमदार कदमांना इशारा

राणे यांचा मुलगा आमदार नीतेश यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, ‘राणे यांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाले नाही, तर आमच्याकडे निधी मागायला यायचे नाही. लीड मिळाले नाही, तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही’, अशी धमकी १३ एप्रिलला झालेल्या सभेत नीतेश राणे यांनी दिल्याचाही उल्लेख नोटिसीत आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Narayan Rane
Ajit Pawar : पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांना मोठा धक्का? 'हा' माजी आमदार महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता!

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्‍यांच्या मदतीने करण्यात आले आहेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहे.

-अ‍ॅड. असीम सरोदे

केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसांत या नोटिसीवर उत्तर द्यावे, अशी अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान देण्यात येईल.

-विनायक राऊत, माजी खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.