रत्नागिरी : 16 ते 17 मे 2021 या कालावधीत रत्नागिरी (ratngiri distrcit) जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याचा हवामान अंदाज खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा अरबी समुद्राच्या (arebiyan sea) पश्चिम किनारपट्टीलगत असल्याने रत्नागिरी जिल्ह्याला 'तौक्ते' चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) तीव्र तडाखा बसण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगडसह पाच तालुक्यांना तडाका बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे कच्ची घरे/ पत्र्याची घरे, गुरांचे गोठे यांची पडझड होवून जिवितहानी होऊ नये, व जिल्ह्यातील नागरीकांचे (ratangiri peopel) सुरक्षतेसाठी ठोस उपाययोजना म्हणून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्याप्रमाणे कुणीही अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, (laxmi narayan mishra) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांना आपत्ती व्यवस्थापन अधिकारानुसार, रत्नागिरी जिल्हयातील लोकांची 'तौक्ते' चक्रीवादळामुळे जिवीत हानी होऊ नये यासाठी १६ आणि १७ मे या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस घराबाहेर पडण्यासाठी या आदेशाव्दारे प्रतिबंध लागू करत असल्याचे सांगितले आहे. पुढील प्रमाणे दर्शविलेल्या कालावधीत त्या- त्या तालुक्यातील लोकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षीत रहायचे आहे.
हा आदेश रत्नागिरी जिल्ह्याच्या तालुकाक्षेत्रासाठी त्या - त्या दिवशी लागू राहील.
राजापूर, रत्नागिरी तालुक्यात 16/05/2021, (रविवार) सकाळी 06. 00 वाजलेपासून 17/05/2021 (सोमवार) रोजीच्या सकाळी 06.00 वाजेपर्यंत
गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यात दिनांक16/05/2021,(रविवार) रोजीच्या सायंकाळी 06.00 वाजलेपासून दिनांक17/05/2021,(सोमवार) रोजीच्या रात्री 11.00 वाजेपर्यंत
तथापि, नैसर्गिक आपत्ती काळात आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय यंत्रणाना सदर आदेश लागू राहणार नाहीत.
सदर कालावधीत ग्रामस्थानी सुरक्षीततेच्या दृष्टिने खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन -
1) मच्छीमार आणि अन्य लोकांनी समुद्रात जाऊ नये. मच्छीमारानी आपआपल्या बोटीचे नुकसान होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवाव्यात.
2) घरात पाणी घुसणार नाही यांची खात्री असल्यास घरातून बाहेर जाऊ नये.
3) घर सुरक्षित नसेल तर साधन सामग्री घेऊन सुरक्षित निवाऱ्यांच्या ठिकाणी जावे.
4) पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
5) आपल्या जवळ स्टोव्ह, काडेपेटी, खादयपदार्थ, मेणबत्त्या, केरोसीन ईत्यादी वस्तू आणि बातम्या ऐकण्यासाठी रेडीओ ठेवावा.
6) अन्नधान्य,पाणी, औषधे सोबत ठेवावी.
7) पाणी उकळून प्यावे.
8) समुद्रकिनाऱ्यावरील लोकांनी सावधगिरी बाळगावी.
9) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार उपाययोजना कराव्यात.
10) Home Quarantine नागरीक आणि इतर लोकं एकत्र मिसळणार नाही यांची काळजी घ्यावी.
11) आपल्या जिवीतास प्राधान्य दयावे.
12) मदतीसाठी फोन नंबर – 02352-226248, 2222333,7057222233.
चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
रत्नागिरी -
जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९)
मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८)
साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)
गुहाघर: श्री. देसाई (९४०५०८५६१५)
दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.