रत्नागिरी : ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे (Omicron Variant) तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारी बाळण्याचे आदेश शासन आणि प्रशासन देत आहे. तरी नागरिक तेवढ्या गांभीर्याने हे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज गांधिगिरी करत पाली आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना मास्क (Mask) लावण्याची कळकळीची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला.
तिसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटना आणि शासनाने वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनीच मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे तरी अजूनही लोक याबाबत तेवढे गंभीर नाहीत. आजही मोठ्या प्रमाणात विवाह, इतर समारंभ, यात्रा, पर्यटन सुरू झाले आहे. मास्क वापरणे अनेकांनी टाळल्याचे दिसुन येते. यातून संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
नुकताच उपमुख्यंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी दौरा केला. या वेळी त्यांनीही मास्क आणि सामाजिक अंतर बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. अनेक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मास्क वापरत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता तसेच विनामास्क येणाऱ्यांना मास्क वाटपही त्यांच्या कार्यक्रमात करण्यात आले.
नागरिकांचे दुर्लक्ष
नागरिकांनी तिसरी लाट रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे वारंवार सागितले तरी नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून त्यांनी पाली या आपल्या गावातून जनजागृती सुरू केली; मात्र कायद्याचा बडगा न उगारता गांधीगिरी मार्गाने. आठवडा बाजारात येणाऱ्या ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना मास्क वापरण्याचे या महामारीमध्ये कसे फायदेशीर आहे, हे पटवून दिले. अनेकांनी त्यांच्या शब्दाला मान देत मास्कचा वापर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.