Raigad News : रेल्वे मार्गासाठी दोन गावांत ड्रोन सर्व्हे; कांडणे गावातील शेती वाचवण्याचा प्रयत्‍न

रोहा रेल्वे स्‍थानकापासून आगारदांडा पोर्टपर्यंत प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार
roha railway station to agardanda port railway route drone survey to save farm agricultural land
roha railway station to agardanda port railway route drone survey to save farm agricultural landSaKAL
Updated on

Raigad News : रोहा रेल्वे स्‍थानकापासून आगारदांडा पोर्टपर्यंत प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. रेल्‍वे मार्गामुळे कांडणे खुर्द आणि कांडणे बुद्रुक या दोन्ही गावांतील १०० टक्‍के शेती नष्ट होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्‍यामुळे आता दोन्ही गावांचे ड्रोन कॅमेराद्वारे सर्व्हे होत असून शेती वाचवण्याचा प्रयत्‍न होत असल्‍याने शेतकरी, ग्रामस्‍थांनी समाधान केले आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या दोन्ही ठिकाणी जलमार्गाने होणाऱ्या दळणवळणाच्या अनुषंगाने रोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. या प्रकल्पांमुळे परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.

याच धर्तीवर मुरूड तालुक्यात आगारदांडा पोर्ट उभे राहत आहे. अदाणी पोर्टस अँड लॉजिस्‍टिक कंपनीसाठी रेल्वे मालगाडी मार्गाचे सर्व्हे पूर्ण झाले, मात्र कांढणे बुद्रुक व खुर्द गावांतील १०० टक्‍के शेती नष्ट होणार असल्‍याने रेल्‍वे मार्ग गावालगत डोंगराच्या बाजूने नेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

त्‍यामुळे दोनही गावांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले होते. रोहा शासकीय विश्रामगृहात तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यंतरी रेल्वे मार्गाचे सादरीकरण, प्रकल्पाविषयी माहिती, शेतकऱ्यांच्या समस्‍यांवर महिनाभरापूर्वी अदाणी ग्रुप, रेल्वे प्रशासन, बाधित गावांतील शेतकरी,

महसूल अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत रेल्वे मार्गासाठी जमिनी अधिग्रहण प्रकल्पाचे अदाणी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरवर सादरीकरण केले. त्यात रेल्वे मार्ग, बोगदे, क्रॉसिंग, पूल, स्थानके यांसह कंपनीचे पर्यावरण धोरण, सीएसआर फंडातून होणाऱ्या कामांची माहिती दिली.

पर्यायी भागातून मार्ग टाकण्याची मागणी

कांढणे खुर्द व बुद्रुक या गावातील ग्रामस्थांनी, विकासाला विरोध नसून यामुळे प्रकल्‍पामुळे गावातील १०० टक्के जमीन बाधित होणार आहे. सर्वच ग्रामस्‍थ भूमिहीन होऊन शेतीच शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होईल, याबाबत चिंता व्यक्‍त करून पर्यायी भागातून रेल्‍वे मार्ग टाकण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख कृष्णा बैकर यांनी केली आहे.

प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गामुळे पूर्णपणे बाधित होणाऱ्या कांडणे खुर्द व बुद्रुक या दोन गावांचे ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. लवकरात लवकर केलेला हा सर्व्हे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमोर सादर केले जाईल.

- सुहास देशपांडे, वरिष्ठ अधिकारी, अदाणी कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.