‘सकाळ’ने जपली विश्‍वासार्हता; आमदार वैभव नाईक

‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा वर्धापन दिन
vaibhav naik
vaibhav naiksakal
Updated on

कणकवली : समाजाच्या सकारात्मक बदलाबरोबरच ‘सकाळ’ने विश्वासार्हता जपली आहे. समाजप्रबोधनासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी लावलेला हातभार हा कौतुकास्पद आहे. ‘संस्कृती’ या विशेष पुरवणीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन देणारे लिखाण ‘सकाळ’ने मांडून नव्या पिढीतील तरुणांना व्यवसायासाठी दिलेले बळ ही ‘सकाळ’ची वेगळी ओळख आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

vaibhav naik
भारताचा उसेन बोल्ट श्रीनिवासाने नाकारली क्रीडामंत्र्यांची 'ती' ऑफर

सकाळ कणकवली विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक कै. नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. वर्धापन दिनाचे औचित्‍य साधून ‘संस्कृती’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन आमदार नाईक, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे, अनिल ठाकूर, अभिजित सावंत, तसेच ‘सकाळ’ कार्यालय कणकवलीचे जाहिरात विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी भास्कर रासम, वितरण प्रतिनिधी कुंदन पिळणकर, बातमीदार तुषार सावंत, राजेश सरकारे, प्रशांत हिंदळेकर, वैभव किंजवडेकर आदी उपस्थित होते. बातमीदार तुषार सावंत यांनी आभार मानले.

vaibhav naik
कट्टर शिवसैनिकच असल्याने ‘ती’ ऑफर नाकारली

‘संस्कृती’ पुरवणीचे प्रकाशन, अन्‌ कौतुक

बातमी देताना ‘सकाळ’ तडजोड करत नाही. बातमीमध्ये एकतर्फी बाजू कधीच घेतली जात नाही. सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग राहिला आहे, असे अशोक करंबेळकर यांनी सांगितलेे. दरम्यान, ‘संस्कृती’ या िवशेष पुरवणीचे प्रकाशन झाले. पुरवणी वाचनीय झाल्याचे सांगत मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.