बोलेरो गाड्यांचे कर्ज भरण्यासाठी राणेंनी प्रतिष्ठा पणाला लावावी; सावंत

राजकीय वापरासाठी राणेंना हवी जिल्हा बँक ः सावंत
Narayan Rane,Satisha Savant
Narayan Rane,Satisha SavantEsakal
Updated on

सावंतवाडी : राजकीय वापरासाठी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा बँक नारायण राणे (Narayan Rane) आणि कुटुंबीयांना ताब्यात हवी आहे. त्यामागे कुठल्याही पक्षाचा दृष्टीकोन नाही किंवा शेतकऱ्यांच्या हिताची त्यांना काही देणेघेणे नाही, असा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satisha Savant) यांनी आज येथे केला.

ज्याप्रमाणे राणे कुटुंबीय आणि भाजपाने जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्याप्रमाणेच २०१४ ला काँग्रेस(Congress) प्रचारासाठी घेतलेल्या आणि थकीत असलेल्या बोलेरो गाड्यांचे कर्ज भरण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी व अण्णा केसरकरांसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या डोळ्यातून आनंदाश्रु काढण्याचे काम करावे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

येथील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे नेते विकास सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डॉन्टस, सुशांत नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, विलास गावडे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले, "२०१४ ला आचारसंहितेच्या कालावधीत प्रचारासाठी तेरा बोलेरो गाड्या आणल्या गेल्या होत्या, त्या कुठून आणल्या? तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी बँकेचे चेअरमन राजन तेली हे होते. त्यांनी चौकशीचा त्रास होऊ नये यासाठी माझ्यासह एकूण १३ जणांच्या नावावर जिल्हा बँकेमध्ये बोलेरोच्या नावे कर्ज प्रकरण केले; मात्र नाबार्डच्या नियमाप्रमाणे संचालक असलेले लोक थकित राहिल्यास त्यांना एक दिवसही पदावर राहण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे माझ्यासह प्रकाश मोर्य, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील या चौघांनी कर्जफेड केले; मात्र उर्वरित नऊ जणांच्या नावावर अद्यापही येथील बँकेमध्ये थकीत कर्ज आहे. बऱ्याच वेळा याबाबत वसुलीची प्रक्रियाही पार पडली. वन टाइम सेटलमेंटमध्ये काहींनी थोडेफार पैसे भरले; परंतु येथील ज्येष्ठ शिवसैनिक असलेल्या अण्णा केसरकर यांच्या नावावर आजही १८ लाख रुपये थकीत आहेत; मात्र असे असतानाही त्या गाड्या आजही राणे कुटुंबियांच्या ताब्यात वापरले जातात."

सावंत पुढे म्हणाले, "त्या बोलेरो गाड्या वापरतो कोण? याच्याशी जिल्हा बँकेचा संबंध नाही. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या थकीत असलेल्या संबंधित यांच्या मालमत्तेवर १०१ नियमाप्रमाणे मालमत्तेवर बोजा चढणार आहे. त्यांना याबाबत कुठलीही सूट देण्यात येणार नसून जिल्हा बँकेचे कर्ज हे भरावेच लागणार आहे. ज्याप्रमाणे भाजपाने व राणे कुटुंबीयाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्याप्रमाणेच थकित बोलेरो गाड्यांचे कर्ज भरण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी आणि ज्या अण्णा केसरकर सारख्यांच्या डोळ्यातून आज अश्रु निघत आहेत त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू काढण्याचे काम करावे. राणे कुटुंबीयांना केवळ राजकीय वापरासाठी जिल्हा बँक ताब्यात हवी आहे. शेतकऱ्यांच्या हिताशी त्यांचे काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून १९ उमेदवार आहेत. ते जिल्हा बँक सुरक्षित ठेवण्याचे निश्चित काम करतील. जिल्हा बँक सुरक्षित राहण्यासाठी आम्ही राणेंची साथ सोडली."

Narayan Rane,Satisha Savant
Belgaum: शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी 7 जणांना अटक, 27 जणांवर कारवाई

तोंड देण्यासाठी मी समर्थ

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यांनी जिल्ह्याबाहेर जावे. माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यापेक्षा मीसुद्धा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ला करा. मी त्याला तोंड देण्यासाठी समर्थ आहे. कटकारस्थान कसे केले जाते आणि अशा कारस्थानाची गुप्तता कशी पाळली जाते, हे मला चांगले माहित आहे, असे सतीश सावंत यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()