सावंतवाडी( सिंधुदुर्ग) : नगराध्यक्ष संजू परब यांनी मनमानी करून जिमखाना येथे नेलेला आठवडा बाजार पुन्हा तेथेच भरवला तर महाविकास आघाडी व्यापार्यासोबत रस्त्यावर उतरेल असा इशारा आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी आज येथे दिला. सावंतवाडी शहराला दिपक केसरकर यांनी कोट्यावधीचा निधी देऊन बसविलेली चांगली घडी बिघडविण्याचे काम नगराध्यक्ष परब करत आहेत.
त्यामुळे ज्या जनेतेने यांना खुर्चीवर बसविले तीच जनता येणार्या काळातील निवडणुकीत त्यांना खाली उतरवेल अशी टिकाही त्यांनी केली.येथील शासकिय विश्रामगृहावर आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आठवडा बाजारावरून सुरू असलेल्या वादाबाबत व्यापार्याच्या बाजूने भुमिका मांडत नगराध्यक्ष परब यांच्यावर जोरदार टिका केली.
व्यापारी आर्थिक अडचणीत
श्री पडते म्हणाले, “नगरपालिका मासिक बैठकिचा कुठलाही ठराव नसतांना आठवडा बाजार जिमखाना मैदानावर नेणे चुकिचे आहे. सुरवातीला शिवसेनेच्या नगरसेवकांना चुकिची माहीती देण्यात आली व हा निर्णय घेतला; मात्र आम्ही व्यापार्यांच्या बाजूने असुन संजू परब यांना शहराचा प्रथम नागरिक म्हणुन हे काम अशोभनिय आहे. आज आठवडा बाजारावर शहरातील इतर भुशारी दुकाने, हॉटेल आदी व्यवसाय अवलंबून होते; मात्र आता हा बाजारच शहराच्या बाहेर गेल्याने येथील व्यापारी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.”
शहराची घडी बिघडविण्याचे काम केले
ते पुढे म्हणाले, “नगराध्यक्षाकडून व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना धमकी देणे कितपत योग्य आहे. यावरून कणकवलीची पुनरावृत्ती येथे येऊ पाहते हे दिसुन आले. शहरात अनेक नगराध्यक्ष होऊन गेले. त्यांनी शहरविकासाच्या दृष्टीने कामे केली; मात्र शहराची घडी बिघडविण्याचे काम त्यांनी केले नाही, परंतू दोन महीने झालेल्या नगराध्यक्षांनी शहराची घडी बिघडविण्याचे काम केले. त्यामुळे जिमखाना येथे हलविलेला आठवडा बाजार पुर्वीच्याच जागेत भरविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मासिक बैठकित आवाज उठवून तसा ठराव मांडतील.”
शहराला महत्व काय राहील?
बाळा गावडे म्हणाले, “व्यापाराबाबत असलेले सर्व निर्णय हे याअगोदरच्या नगराध्यक्षांनी व्यापार्यांना विश्वासात घेऊनच घेतले होते.आज मंदी असल्याने शहरातील व्यापार ठप्प आहे अशातच मंगळवारचा आठवडा बाजार दुसरीकडे हलकविला तर या शहराला महत्व काय राहील? त्यामुळे एकीकडे भाजी आणायला आणि दुसरीकडे कडधान्य आणायला जाण्यापेक्षा पर्यायी मार्ग म्हणुन संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे होणारे कॉम्प्लेक्स तीन मजली उभारून पहील्या आणि दुसर्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांना बसवा.यात स्थानिकांना प्राधान्य द्या.” यावेळी त्यांनी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष यांनी धमकी दिल्याचा आरोप करत धमकीबाबत जाहीर निषेध व्यक्त केला.या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ,जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, महीला संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार, प्रशांत कोठावळे, बबन राणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा- कोल्हापूरातील या 4 मार्गाना मिळाला जिल्हाचा दर्जा...
यामागच षडयंत्र काय ?
नगराध्यक्ष म्हणुन स्थानिक रहीवाशाचे प्रश्न सोडविणे हे संजू परब यांचे काम आहे; मात्र प्रशासनाचा अनुभव कमी असल्याने ते वस्तुस्थिती हाताळण्यात फेल ठरले; मात्र असे असले तरी दोन महीन्यातच नेहमीच्या जागेतील आठवडा बाजार जिमखाना मैदान येथे नेण्यामागचे नेमक षडयंत्र काय अशा सवाल रूपेश राऊळ यानी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.