सावंतवाडी : नारळी पौर्णिमेस मोती तलावावर गर्दी

खेमसावंत-भोसले, पोलिस निरीक्षकांकडून नारळ अर्पण
savntwadi
savntwadisakal
Updated on

सावंतवाडी : शहरातील नारळी पौर्णिमा उत्सव प्रथेप्रमाणे संस्थानचे राजे खेमसावंत-भोसले व पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते मोती तलावात विधीवत नारळ अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले उपस्थित होते.

कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्ष साध्या पद्धतीने गर्दी न करता मोती तलावाला नारळ अर्पण करण्यात आला होता. मात्र, यावर्षी पूर्वीसारखाच लोकांच्या उपस्थितीत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. शेकडो नागरिकांनी मोती तलावात नारळ अर्पण केले. हा विलोभनीय क्षण पाहण्यासाठी तलावाकाठी मोठी गर्दी जमली होती. शहराची शान असलेल्या मोती तलावाला दरवर्षी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करण्याची प्रथा संस्थान काळापासून सुरू आहे. यावर्षी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.

सुरवातीला प्रथेप्रमाणे मानाचा नारळ सावंतवाडी पोलिस ठाण्यातून पोलिस निरीक्षक कोरे यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत मोती तलाव काठावर आणण्यात आला. त्यानंतर संस्थानचे राजे खेमसावंत-भोसले व पोलिस निरीक्षक कोरे यांनी पुरोहीताच्या उपस्थित मानाच्या नारळाची विधीवत पूजा केली व तो तलावाला नारळ अर्पण केला. यावेळी एकापाठोपाठ एक शेकडो सावंतवाडीकरांनी तलावाला नारळ अर्पण केले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात सुना सुना असलेला मोती तलवाचा काठ मात्र यावर्षी नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.