तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगची बोट पलटी, २ तरुणांचा मृत्यू

बोटीवरील 20 जण पाण्यात फेकले गेले असून यात सहा मुलांचा समावेश होता.
कोकण
कोकणsakal
Updated on
Summary

बोटीवरील 20 जण पाण्यात फेकले गेले असून यात सहा मुलांचा समावेश होता.

मालवण - तारकर्ली पर्यटन केंद्र समोरील समुद्रात स्कुबा डायव्हिंगची बोट पलटी होऊन दुर्घटना घडली आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. बोटीवरील 20 जण पाण्यात फेकले गेले असून यात सहा मुलांचा समावेश होता. (Konkan Latest News) अत्यवस्थ बनलेल्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून जवळील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात सहा मुलांचा जीव वाचला आहे. (scuba boat drawn in tarkarli sea)

मिळालेली माहिती अशी की, मुंबई, पुणे, अकोला तसेच अन्य भागातील काही महिला लहान मुलांसह पर्यटक तारकर्ली येथील समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते. स्कुबा डायविंग करून बोटीतून किनाऱ्यावर माघारी जाताना किनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरावर बोट अचानक पलटी झाली. त्यामुळे बोटीवरील लोक पाण्यात फेकले गेले. यात महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे किनारपट्टी भागात खळबळ उडाली.

कोकण
'जर शरद पवार मला भेटले तर, आदरानं त्यांना प्रणाम करणार'

बोटीवरील स्कूबा व्यावसायिकांनी बुडालेल्या सर्वांना किनाऱ्यावर आणले. यावेळी बेशुद्ध असणाऱ्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत दोघे तरुण पुणे व अकोला येथील असल्याची माहिती मिळत आहे. अन्य एक महिला पर्यटक गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत दीड ते तीन वर्षांपर्यंतची सहा मुले पाण्यात फेकली गेली होती. या मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने मुलांचे प्राण वाचले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

तारकर्ली पर्यटन केंद्र समोरील समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन झालेल्या अपघातात पर्यटक पाण्यात बुडाले या घटनेची माहिती मिळताच पर्यटन व्यवसायिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार प्रांत पोलिस अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.

कोकण
लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' तरुणाचा आढळला मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.