Good News - राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे जोडले जाणार

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे थेट जोडले जाणार आहे
Good News - राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे जोडले जाणार
Updated on

रत्नागिरी : जलवाहतूक, नागरी वाहतूक आणि पर्यटन या क्षेत्रात गेमचेंजर ठरू शकेल, अशा योजनेचा एमओयू केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. ‘उडे देश का आम आदमी’ (ude desh ka aadami) या अंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र, महाराष्ट्र अशा राज्यांसह आणखी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (ratnagiri district) गणपतीपुळे (ganpatipule) हे पर्यटनस्थळ यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे थेट जोडले जाणार आहे. हा प्रकल्प आणि वाहतूक पर्यावरणस्नेही आहे, हे सर्वांत महत्त्वाचे. (seaplane-landing-in-ratnagiri-ganpatipule-central-policy ude-desh-ka-aadami)

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग आणि मनसुख मंडाविया यांच्या उपस्थितीत बंदर, नौकावहन व जलवाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) (MOC) यांनी यासाठीच्या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. सी प्लेन सेवा प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संभाव्य विमान परिचालकांमार्फत विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) फर्मवर्क अंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एमओपीएसडब्ल्यूच्या तत्त्वाखाली सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एसडीसीएल) तो कार्यान्वित करणार आहे. संभाव्य एअरलाइन्स ऑपरेटरची निवड प्रक्रियेद्वारे होणार असून एमओपीएसडब्ल्यू ठिकाणे निश्‍चित करेल. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आरसीएन-उडान उपक्रमाचा एक भाग म्हणून सी-प्लेन सेवा विकसित केल्या जाणार आहेत. एमसीए, आरसीएस-उडान योजनेंतर्गत निधी किंवा आर्थिक साहाय्य पुरवण्यात येणार आहे. सी-प्लेनसाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

Good News - राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे जोडले जाणार
पणदेरी धरणाची गळती थांबविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु

मांडवी-कांडला; अंदमान निकोबार-लक्षद्वीप

एमओपीएसडब्ल्यूने सागरमाला सी-प्लेन सेवेसाठी (एसएसपीएस) दिल्लीतील यमुना रिव्हरफंट आणि अयोध्या, तिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) आणि चंदिगड अशा ठिकाणी सेवा देण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सुरत ते द्वारका, मांडवी आणि कांडला, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या द्वीपसमूहाचाही सी-प्लेनसाठीच्या ठिकाणात समावेश आहे.

भारतात फक्त एक सी-प्लेन; समिती स्थापन होणार

सध्या भारतात फक्त एक सी-प्लेन सेवा कार्यरत आहे, ती अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफंट आणि केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान. सामंजस्य करारानुसार समुद्रातील विमानसेवेचे कामकाज वेळेवर पूर्ण करण्यासाठी अनेक मंत्रालयांचा अधिक समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे.

Good News - राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे जोडले जाणार
वाहन खरेदी व्यवसाय फास्ट ट्रॅकवर; झाली कोट्यवधीची उलाढाल

जलद व स्वस्त पर्याय

सागरमालाअंतर्गत सी-प्लेन चालवण्यासाठी इच्छुकांचे देकार लिलावामार्फत स्वीकारले जाणार आहेत. त्याला अनुषंगिक सोयीची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. प्रदूषणविरहित अशी वाहतूक असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास टळणार आहे. थेट पर्यटनस्थळी पोहोचता येत असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहे. प्रादेशिक स्तरावर जलद व तुलनेने स्वस्त असा हा वाहतुकीचा पर्याय आहे.

एक नजर...

  • एकूण २८ सी-प्लेन रूट

  • १४ वॉटर एरोड्रमची उभारणी सुरू

  • ४५० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

  • अंदमान, निकोबार, लक्षद्वीपही जोडणार

Good News - राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे जोडले जाणार
पणदेरी धरणाच्या मुख्य भिंतीला मोठी गळती; परिसरात भीतीचे वातावरण

दृष्टिक्षेप...

  • राष्ट्रीय स्तरावर गणपतीपुळे थेट जोडले जाणार

  • द्वीपसमूहातही सी-प्लेनसाठीच्या ठिकाणात समावेश

  • सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी समन्वय साधणार

  • एमसीए, आरसीएस-उडान योजनेंतर्गत निधी

  • रनवे व स्ट्रीपची गरज नाही; नावीन्यपूर्ण प्रवास

  • थेट पर्यटनस्थळी लॅंडिंग; प्रवास वेळ वाचेल

  • प्रदूषणविरहित वाहतूक; जलद, तुलनेने स्वस्त पर्याय

"उडान अंतर्गत - सागरमाला सी प्लेन प्रकल्पामुळे गणपतीपुळे, मुंबई-शिर्डी, लोणावळा आदी ठिकाणी पर्यटन विकासाला गती येईल आणि प्रादेशिक स्तरावर जलद, तुलनेने स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. फ्लेाटिंग जेटी असल्याने प्रवासात सुलभता येईल. रनवे व स्ट्रीपची गरज नसल्याने नावीन्यपूर्ण प्रवासाकडे पर्यटकांचा ओढा राहील. थेट पर्यटनस्थळी लॅंडिंग असल्याने प्रवासातील वेळ वाचेल."

- अ‍ॅड. विलास पाटणे, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.