कोरोनाबाधित महिलांना मुंबईतून रत्नागिरीत आणणाऱ्या टेंपो चालकाचा शोध सुरू 

Search for the tempo driver who travel two corona positive patient mumbai to ratnagiri
Search for the tempo driver who travel two corona positive patient mumbai to ratnagiri
Updated on

रत्नागिरी - रविवारी रत्नागिरीत चौघांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. या चौघांपैकी दोन महिला या एका टेम्पोतून रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. त्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. तो आंब्याचा टेम्पो असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतून टेम्पोवाल्याने महिलांना माळनाका येथे सोडल्यानंतर या महिला जिल्हा रुग्णालयात स्वतःहून दाखल झाल्या. या महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्या टेम्पोवाल्याचा शोध यंत्रणा घेत आहे. 
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाग्रस्त संख्या झपाट्याने वाढत आहे. आता पर्यंत 42 जण कोरोना बाधित आढळले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. 

अशातच वडाळा येथून आलेल्या त्या दोन्ही महिला कोरोना पॉसिटीव्ह आढळल्या आहेत. या दोन महिलांनी 7 मे रोजी वडाळा येथून प्रवास सुरु केला. वडाळा ते चेंबूर असा प्रवास त्यांनी टॅक्सीने केला. चेंबूर येथून त्या आंब्याच्या ट्रकमध्ये बसल्या. 8 मे रोजी त्या रत्नागिरीत माळनाका येथे दाखल झाल्या. 8 मे रोजी सकाळी त्या स्वतः हून जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या. त्यांना तात्काळ आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले. रविवारी या दोघींचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे समोर आले. 

यानंतर यंत्रणेची पुरती झोप उडाली. या दोन महिलांना रत्नागिरीत एका आंबेवाल्याने आणल्याचे समोर आले आहे. त्या चालकाचे नाव त्या महिलांना माहीत नसून तो केवळ आंबेवाला होता असे त्या महिलांनी सांगितले आहे. तो ट्रकवाला राहतो कुठे याचा शोध आता यंत्रणा घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.