आराम बसमधील तंबाखुजन्य वस्तू जप्त

Seizure tobacco items travels vaibhavwadi konkan sindhudurg
Seizure tobacco items travels vaibhavwadi konkan sindhudurg
Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - तंबाखुजन्य वस्तूंची अवैध वाहतूक करणाऱ्या आराम बसवर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी बसच्या चालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 24 हजाराच्या मुद्देमालांसह आराम बस जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास करूळ तपासणी नाक्‍यावर करण्यात आली. 

मुंबईहुन गोव्याकडे जाणारी आराम बस क्रमांक (एमएम 07,पी-8200) करूळ तपासणी नाक्‍यावर असलेले पोलिस कॉन्स्टेबल मारूती सोनटक्के, संदीप राठोड या कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबविली. तपासणी करताना पोलिसांना गाडीच्या सामानकक्षात पार्सल दिसली.

पाहणी केली असता एका बॅगेत हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, कोळसा आढळला. शिवाय दुसऱ्या एका बॅगेत वैधानिक इशारा नसलेली सिगारेटची पाकिटे निदर्शनास आली. त्यामुळे ही माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांना दिली. उपनिरीक्षक प्रवीण देसाई घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अधिक चौकशी करून आरामबस येथील पोलिस स्थानकात आणली. त्या बसमधील सर्व साहित्यांची पुन्हा तपासणी केली. तपासणीअंती बसमध्ये 24 हजाराच्या सिगारेट आढळल्या. 

सिगारेट आढळल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हुक्का ओढण्यासाठी लागणारी भांडी वाहतूक करण्यास परवानगीची गरज नाही का? असे विचारले असता पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी परवानगी लागत नसल्याचे स्पष्ट केले. 

दहा लाखाची बसही जप्त 
चालक इंदरसिंग हिरालालजी गुजर (वय 45) व वाहक भैरू शंभुनाथ (वय 43, दोन्ही रा. मध्यप्रदेश) यांच्यावर तंबाखुजन्य प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 10 लाखाची आरामबसही जप्त केली. दोन्ही संशयितांना सोमवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी आरामबसवर कारवाई केल्यामुळे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून गोव्याच्या दिशेने पाठविण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.