भाजपला पराभव माहीत होता ; उपनगराध्यक्षपद वाचविण्यासाठी दिली कडवी झुंज

the series of bhojane in chiplun ratnagiri part two BJP sure to defeat of post in chiplun
the series of bhojane in chiplun ratnagiri part two BJP sure to defeat of post in chiplun
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : महाविकास आघाडीने नगराध्यक्षांच्या विरोधात निलंबनाचा ठराव मांडला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्या वेळी अनुभवी भोजनेंनी भाजप व नगराध्यक्षांची बाजू घेऊन किल्ला लढवला नाही; मात्र पालिकेतील निर्णय प्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्यामुळे भोजने काही महिने पालिकेतील घडामोडींपासून लांब होते. तरीही त्यांचे पद वाचवण्यासाठी भाजपने कडवी झुंज दिली.

पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता असताना प्रशासन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या सूचनेप्रमाणे चालायचे. भोजने उपनगराध्यक्ष पद आणि समितीपर्यंत मर्यादित होते. भोजनेंनी सुचवलेल्या मुद्‌द्‌यांवर भाजपमध्ये एकमत व्हायचे नाही. त्यामुळे भोजनेविरुद्ध भाजपचे नगरसेवक, असा वादही रंगला होता. त्यांच्या प्रभागातील कामावरूनही वाद झाला होता. भाजपच्या वरिष्ठांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यात फारसे यश आले नाही.

महाविकास आघाडीकडून पालिकेत भाजपला कात्रीत पकडण्याचे काम सुरू आहे. नगराध्यक्षांनी मंजूर केलेल्या १९ कामांची चौकशी लावण्यात आली. नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नगराध्यक्षांना बडतर्फ करण्याची मागणी झाली. त्या वेळी आशिष खातू, विजय चितळे यांनी बाजू मांडली. भोजनेंना पदाचा अन भाजपला त्यांचा फायदा नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली. उपनगराध्यक्ष भोजने तरी तुमच्याबरोबर आहेत का? असा सवाल भाजपला विचारला जायचा. खातू यांनी भोजने आमच्याबरोबरच आहेत. त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला आहे, त्यात ते व्यस्त असतात. पण पालिकेतील प्रत्येक घडामोडींची माहिती आम्ही त्यांना देत असतो. त्यांचा सल्लाही घेत असतो, अशी बाजू मांडली होती. भोजनेंना पदाचा फायदा झाला नाही, भाजपलाही भोजनेंचा फायदा झाला नाही. 

सरस असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न

भोजनेंवर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी विशेष सभेची मागणी करण्यात आली. सभेत अविश्‍वास ठराव मांडला गेला तर संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीचा ठराव मंजूर होणार, हे भाजपला माहित होते. तरीही दोन तास चर्चा रंगली. महाविकास आघाडीच्या २२ नगरसेवकांसमोर भाजपच्या चार नगरसेवकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत खिंड लढवली. आम्ही चौघे सरस आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला. 

"भाजपकडून उपनगराध्यक्ष पद गेले, याचे दुःख आहेच. आम्ही भोजनेंचे पद वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी तसेच शिवसेनेतील काही नगरसेवकांशी चर्चा केली. परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला."

- आशिष खातू, नगरसेवक भाजप

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.