धक्कादायक! नात्यातल्या व्यक्तीने अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची राहिली गर्भवती; पोटात दुखू लागलं अन्..

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोक्सो कायद्यान्वये संशयिताविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
POCSO Act Case Kankavali
POCSO Act Case Kankavaliesakal
Updated on
Summary

पीडिता कुटुंबासोबत कामासाठी आली होती. ती कुटुंबासोबत गावी गेली असताना तिच्या वारंवार पोटात दुखू लागल्याने कोल्हापूर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते.

कणकवली : परराज्यातून कामासाठी एका तालुक्यात आलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातल्याच एकाने अत्याचार केल्याने ती गर्भवती (Pregnant) राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयिताला पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ यांच्या पथकाने कोल्हापुरातून (Kolhapur) अटक केली. ही घटना जानेवारी ते जून २०२४ या कालावधीमध्ये घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता कुटुंबासोबत कामासाठी आली होती. ती कुटुंबासोबत गावी गेली असताना तिच्या वारंवार पोटात दुखू लागल्याने कोल्हापूर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याची बाब पुढे आली.

POCSO Act Case Kankavali
Murder Case : जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या चुलत भावांचा खून; शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळले मृतदेह

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोक्सो कायद्यान्वये संशयिताविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा शून्य नंबरने कणकवली पोलिसांकडे अधिक तपासासाठी वर्ग केला. सुरुवातीला पीडितेने भीतीपोटी काही सांगितले नाही, मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही माहिती समोर आली. संशयिताला कोल्हापूरमधून अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक राजकुमार मुंढे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.