Raigad Politics News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एक गट सामील झाला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आमदार अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी मिळाली आहे. तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य चौकात शुभेच्छांचे फलक लावले आहेत.
मात्र या फलकावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.राष्ट्रवादी फुटीर गटातून खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या माजी मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.(Latest Marathi News)
जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार असताना त्या पैकी एकालाही मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटात नाराजीचे सूर उमटत आहेत. उलटपक्षी एक वर्षा पूर्वी तटकरे हटाव मोहीम हाती घेऊन ती मोहीम यशस्वी करणाऱ्यांना या अमदारांना ठेंगा दाखवत तटकरेंनी आपण जिल्ह्याचे शातीर राजकारणी हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.(Latest Marathi News)
तर दुसरी कडे खासदार शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत आहेत. मात्र नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अदिती तटकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेच फोटो गायब आहेत. या बाबींमुळे राष्ट्रवादी पक्ष एकसंघ अथवा एकच आहे, हा दावा कितपत योग्य आहे हे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.