Jayant Patil: ठाकरेंनी तिसरा उमेदवार दिला, शरद पवार नाराज? जयंत पाटलांनी सांगितलं निवडणुकीत गेम कसा झाला?

Jayant Patil News in Marathi: जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आणि पराभवाचे खापर उबाठा शिवसेनेवर फोडले.
sharad pawar uddhav thackeray
sharad pawar uddhav thackerayesakal
Updated on

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांना या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता.

मात्र, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी देत जयंत पाटील यांना मदत करण्यास नकार दिल्याची चर्चा होती. यामुळे एकूणच महाविकास आघाडीतील बिघाडी आणि शिवसेना व शरद पवार यांच्यातील तणाव चर्चेत आला आहे.

मतांचा कोटा आणि पराभव-

जयंत पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत १२ मतं मिळाली. ही १२ मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या १२ आमदारांची असल्याचा अंदाज बांधला जात होता. जयंत पाटील यांनी अलिबाग येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विधान परिषदेतील आपल्या पराभवाचे विस्तृत विश्लेषण केले.

जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आणि पराभवाचे खापर उबाठा शिवसेनेवर फोडले. महाविकास आघाडीच्या दोनच उमेदवार देण्याच्या निर्णयात शिवसेनेने तिसरा उमेदवार दिला, यामुळे शरद पवार नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले.

sharad pawar uddhav thackeray
Pooja Khedkar : ''पूजा खेडकरला जन्मठेपेची शिक्षा द्या, ज्यांनी यापूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढले त्यांना शोधून काढणार'' बच्चू कडू म्हणाले...

महाविकास आघाडीतील मतांचे गणित कसं होतं-

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ३७ आमदार, ठाकरे गटाचे १२ आमदार, आणि शरद पवार गटाचे १५ आमदार होते. शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जयंत पाटील यांची १६ मते निश्चित होती. विजयासाठी आवश्यक असलेल्या २३ मतांसाठी अधिकच्या ७ मतांची गरज होती. मात्र, अपेक्षित मतांपेक्षा ४ तर एकूण ११ मते कमी पडली.

sharad pawar uddhav thackeray
Assembly Elections: विधानसभा निवडणुकांसाठी पहिला उमेदवार ठरला! महायुतीतूनच फडणवीसांच्या मर्जीतल्या आमदाराला आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.