छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवकालीन गढीला मिळणार पुन्हा झळाळी; ऐतिहासिक ठेव्याचे पालटणार रूप

Lanja-Rajapur Assembly Election : लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात साटवली येथे शिवकालीन गढी (बंदर) आहे.
Shiv Period Port
Shiv Period Portesakal
Updated on
Summary

काळाच्या ओघात या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले गेले नसल्याने या गढीची पार दुरवस्था झाली आहे.

लांजा : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांजा तालुक्यातील शिवकालीन गढीला (Shiv Period Port) पुन्हा एकदा नवीन झळाळी मिळणार आहे. भाजपच्या लांजा-राजापूर विधानसभा निवडणूक (Lanja-Rajapur Assembly Election) प्रमुख उल्का विश्वासराव यांनी यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात साटवली येथे शिवकालीन गढी (बंदर) आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात या ठिकाणी साटवली नदीतून गलबतातून येणारा माल साटवली गढी या ठिकाणी साठवला जात असे. त्यामुळे या गढीला साटवली असे नाव पडल्याचा दाखला आहे; मात्र काळाच्या ओघात या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले गेले नसल्याने या गढीची पार दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, झाडेझुडपे, पालापाचोळा यामुळे आजघडीला या ऐतिहासिक ठेव्याचे रूपच पालटून गेले आहे.

Shiv Period Port
Mahabaleshwar Project : 'नवीन महाबळेश्वर'चा आराखडा प्रसिद्ध; 235 गावांचा समावेश, कोणते तालुके प्रकल्पात असणार?

काळाच्या ओघात ही गढी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या गढीचा असलेला शिवकालीन इतिहास लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून शिवगंध प्रतिष्ठान लांजा आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याकडून या गढीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात येते; मात्र या गढीची शासनाकडून किंवा पुरातत्व खात्याकडून कोणत्याही प्रकारे जपणूक न केल्याने तिची दुरावस्था होत आहे.

Shiv Period Port
Saundatti Yellamma : सौंदत्ती डोंगरावर 'कडक भाकरी'ची कशी झाली सुरुवात, या भाकरीला का आहे महत्त्व? जाणून घ्या..

ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या लांजा-राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी साटवली येथील शिवकालीन गढीवर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षित आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गढीला पुन्हा एकदा नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. याबद्दल साटवली ग्रामस्थ व शिवप्रेमींतून समाधान व्यक्त केले जात आहे.

पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी लांजा व राजापूर तालुक्यातील विविध ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून दिला जात आहे. त्यामध्ये शिवकालीन गढीचा समावेश आहे. त्याला शासनाकडून निधी दिला आहे.

-उल्का विश्वासराव, भाजप नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.