'शरद पवार शांत राहून काय करतील हे कोणालाच कळणार नाही, ते मुरब्बी राजकारणी'; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

Shiv Sena leader Anandrao Adsul : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती, भाजपचे नेते वेगळे होते. तेव्हाची युती अगदी मजबूत होती.
Shiv Sena leader Anandrao Adsul
Shiv Sena leader Anandrao Adsulesakal
Updated on
Summary

'राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचे चांगले काम सुरू आहे.'

रत्नागिरी : शरद पवार आणि अजित पवार अशी तुलना करता येणार नाही. परंतु, शरद पवार हे अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. ते शांत राहून काय करतील, हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) हे राजकारणात आजही सरस आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि को-ऑपरेटिव्ह बॅंकस् एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी दिली.

दरम्यान, महायुतीचे संबंध चांगले आहेत. परंतु, रत्नागिरी वगळता दावे-प्रतिदावे होत राहणार; परंतु शासनाने आणलेल्या अनेक योजना प्रत्यक्ष राबविल्या जात असून, थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Shiv Sena leader Anandrao Adsul
'कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्नं बघणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा'; हसन मुश्रीफांचा कोणावर रोख?

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल युनियनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनच्या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. अडसूळ म्हणाले, ‘राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचे चांगले काम सुरू आहे. शासनाने सर्व सामान्यांपासून गरीब, विद्यार्थी, वयोवृद्ध आदींसाठी विविध योजना आणल्या आणि त्या प्रत्यक्ष राबविल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत नक्कीच महायुतीला यश मिळेल.’

Shiv Sena leader Anandrao Adsul
'धनगरांनी शेळ्या-मेंढ्या राखायचं बंद केलं, तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल' पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

युनियनच्या वार्षिक सभेसाठी रत्नागिरीत आलो होतो. कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरडीसीसी बॅंकेला ५५ कोटींचा नफा झाला आहे. बॅंकेचा नफा आणखी कसा वाढेल यादृष्टीने काम करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

युतीचा तो काळ आता गेला

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती, भाजपचे नेते वेगळे होते. तेव्हाची युती अगदी मजबूत होती. एकमेकांना मान सन्मान होता. त्यांचे विचार वेगळे होते. त्यामुळे जुन्या काळाशी आता तुलना करता येणार नाही. आता तो काळ गेला, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.