आघाडी न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढणार; विनायक राऊतांचा इशारा

Vinayak Raut
Vinayak Raut sakal
Updated on

वेंगुर्ले : कोरोनामुळे एका बाजूने नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद झाले तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेलचे भाव भडकले. यातून केंद्र सरकार जनतेला लुबाडण्याचे काम करत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा आघाडी न झाल्यास शिवसेनेला स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत. त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी काल येथे केले.

येथील तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा काल येथील साई मंगल सभागृहात खासदार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याचे उदघाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

संजय पडते, यशवंत परब, अजित राऊळ, राजू शेटये, रुपेश पावसकर, बाळा दळवी, सुनील डुबळे, सचिन वालावलकर, सचिन देसाई, सुनील मोरजकर, सुकन्या नरसुले, मंजूषा आरोलकर,सागर नाणोसकर, पंकज शिरसाट, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, विवेकानंद आरोलकर, संजय गावडे, निलेश चमणकर आदी उपस्थित होते.

आज जिल्हयात कोटयावधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत; मात्र ठेकेदारांनी लॉबी केल्याने पैसे असूनही ठेकेदार कामे करीत नाहीत. कुडाळ रस्त्यासंदर्भात २८ ला मुंबईत बैठक झाली. येत्या दोन तीन महिन्यात जिल्हयातील सर्व मुख्य रस्ते केले जातील. आता होवू घातलेल्या निवडणुका या तूमच्या आहेत. शिवसेनेमार्फत झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन यावेळी केसरकर यांनी केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.

डिझेलसाठी नाहीत पैसे

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी 67 नवीन अम्ब्युलस प्राप्त झाल्या आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या नाकर्तेपणामुळे त्यात डिझेल भरण्यास पैसे नाहीत, हा या जिल्हा परिषदेचा कर्मदळीद्रीपणा आहे.

प्रसंगी न्यायालयात जाणार

जिल्हा रुगणालायच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे; मात्र त्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये व नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला त्याचा त्रास होऊ नये. म्हणून राणे यांनी केंद्रातून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामात आडकाठी निर्माण करण्याचे काम चालू केले आहे, असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत हे शासकीय महाविद्यालय चालू करून येथील गोर गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून गरज पडल्यास न्यायालयाच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालू करणार असल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.