राजकोट किल्ल्यावर काल ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे.
मालवण : येथील राजकोटमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या (Shivaji Maharaj Statue) घटनेच्या चौकशीसाठी सरकारकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील न्याय वैद्यक पथकाने घटनास्थळी भेट देत तपास केला. यावेळी राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) कडेकोट बंदोबस्त तैनात होता. राजकोट येथे शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप यांच्यात बुधवारी (ता. २८) झालेल्या राड्याप्रकरणी येथील पोलिसांनी (Malvan Police) दोन्ही गटांतील ४२ जणांसह अनोळखी मिळून दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.