कट्टर शिवसैनिकच असल्याने ‘ती’ ऑफर नाकारली

निनाद देशपांडे : निवडणुकीत हरलो, तरी लढलोच
shivsena
shivsenasakal
Updated on

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीवेळी आपली पत्नी निधी देशपांडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘त्या’ राजकीय पक्षाकडून आपल्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेली ऑफर आम्ही नाकारली. मी कट्टर शिवसेना कार्यकर्ता असल्याने हरलो तरी चालेल; पण लढलो, असा गौप्यस्फोट युवासेना तालुका अधिकारी निनाद देशपांडे यांनी केला.

shivsena
अपयशाने खचू नका, कामाला लागा-राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामंत

देशपांडे यांना काय मते मिळणार? अशी डरकाळी फोडणाऱ्यांनी आम्हाला मिळालेल्या मतांचा अभ्यास करावा असेही त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग ६ मधील शिवसेना उमेदवार निधी देशपांडे पराभूत झाल्या. या अनुषंगाने युवासेना तालुका अधिकारी श्री. देशपांडे माध्यमांशी बोलत होते. या वेळी निधी देशपांडे उपस्थित होत्या. श्री. देशपांडे म्हणाले, निधी यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘आपल्याकडून उमेदवारी अर्ज भर, बिनविरोध करूया’ म्हणून ऑफर आली होती; मात्र आलेली ऑफर नाकारली. आमच्या उमेदवाराला १८८ मते मिळाली.

मागील निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीमध्ये निवडणूक लढवली असताना तत्कालीन भाजप उमेदवाराला १८६ मते पडली होती. त्यामुळे देशपांडे यांना किती मते पडतील? असे उपरोधिक बोलणाऱ्यांना शिवसेनेची ताकद दिसली असेल. येत्या पाच वर्षांत सत्तेच्या माध्यमातून विकासकामे केल्यावर जनताच आपल्याला बिनविरोध निवडून देईल. त्याची चिंता ‘त्या’ राजकीय पक्षाने करू नये असे सांगितले.

shivsena
अपयशाने खचू नका, कामाला लागा-राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामंत

मिळालेल्या मतांवर समाधानी

यावेळी निधी देशपांडे यांनी, हरले तरी मिळालेल्या मतावर समाधानी आहे. या पुढच्या काळात मतदारांनी दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल त्यांची कामे करून त्यांच्या अडचणी दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.