..तर भाजपची जन आशीर्वाद यात्रा शिवसैनिक रोखतील; सेनेचा इशारा

ShivSena
ShivSenaesakal
Updated on

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, हे गुन्हे दाखल न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेतर्फे (ShivSena) तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच भाजपची जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) शिवसैनिक रोखतील, असा इशारा शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख शैलेश भोगले (Shailesh Bhogale) यांनी दिला.

Summary

राणेंची उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील भडक व शांतता बिघडवणारी वक्तव्य जिल्ह्यातील शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्याकडे सादर केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शहर प्रमुख शेखर राणे, उप शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उप जिल्हा प्रमुख सुजित जाधव, अॅड. हर्षद गावडे, रुपेश आमडोस्कर, विलास गुडेकर, ललित घाडीगवकर, शिरीष घाडीगवकर, संतोष गुरव, आनंद ठाकूर, रोहित राणे, निसार शेख, सुभाष परब, अरुण राणे, गणेश राणे, आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ShivSena
'रामदासांनी मिठी मारून शुभेच्छा दिल्या असत्या, तर आनंद झाला असता'

निवेदनात म्हटले आहे, की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बदनामीकारक व तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. या घटनेचा शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे व अशांतता निर्माण करणे या दृष्टीने नारायण राणे हे सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करत आहेत, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

ShivSena
मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान; मुश्रीफांचे राणेंवर टीकास्त्र

अशा स्थितीत नारायण राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेली वक्तव्ये लक्षात घेता यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला असतानाच राणे यांचीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील भडक व शांतता बिघडवणारी वक्तव्य ही जिल्ह्यातील शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे आतापर्यंत नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक व व सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्याच्या संदर्भात नारायण राणे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत हे गुन्हे दाखल झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()