रात्रीत राजकीय सुत्रं हालली, कोकणातील सेना आमदार गुवाहाटीत दाखल

सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमध्येच उभी फुट पडली आहे.
latest konkan political News
latest konkan political News
Updated on
Summary

सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमध्येच उभी फुट पडली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यातील अभेद्य असलेल्या शिवसेनेच्या भुरूजाला भगदाड पडले आहे. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेचा हात सोडुन देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होणे पसंद केले आहे. आज ते गुवाहाटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. (latest konkan political News)

आमदार कदम यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, सेनेचे संख्याबळ घटत असून एकनाथ शिंदेंच्या गटाचा आकडा वाढताना दिसत आहे. माजी मंत्री आणि सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध किती घट्ट आहेत हे यातून अधोरेखीत झाले आहे.

latest konkan political News
सेनेचे बंडखोर आमदार म्हणाले, आमची नाराजी नेतृत्वावर नाही तर...

राज्याच्या राजकारनाला कालपासून वेगळी कलाटणी मिळाली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमध्येच उभी फुट पडली आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करत पक्षाविरोधी बंड पुकारले आहे. सेनेतील नाराज आमदारांसह अपक्ष आमदार मिळून हा आकडा ४० वरून आता ५० पर्यत जाण्याचा दावा केला जात आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. कालपासून सुरू झालेल्या मोठ्या राजकीय उलथापलथीत आता भाजप आणि नारज गट एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्याअनुषंगाने आज सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांकडुन संख्याबळाची चाचपणी केली जात आहे.

latest konkan political News
Eknath Shinde: शिवसेनेला धक्क्यावर धक्के; दिवसभर काय घडलं वाचा

एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबतही अजून कोणताही निर्णय नाही. आता हे सर्व आमदार सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले आहेत. एक-एक करत एकनाथ शिंदेला नाराज आमदारांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार आमदारांनी आपली निष्ठा पक्षाशी आहे. अडचणीच्यावेळी आम्ही शिवसेना पक्षाबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सेना अभेद्य असल्याचे दावा केला होता. यात रत्नागिरीचे आमदार आणि मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार योगेश कमद यांच्या समावेश होता.

दरम्यान, एका रात्रीमध्ये राजकीय सुत्र हालली. आमदार योगेश कदम यांचे वडील माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची आणि एकनाथ शिंदे यांची आज सकाळी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर राजकीय समिकरणे झपाट्याने बदलुन आमदार योगेश कदम यांनी सेनेचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. त्यामुळे या घडामोडीत जिल्ह्यातही सेनेला हादरा बसला आहे.

latest konkan political News
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.