राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे

१३ ला काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होते की स्वबळावर निवडणूक लढवितात हे स्पष्ट होणार आहे.
राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे
Updated on
Summary

१३ ला काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होते की स्वबळावर निवडणूक लढवितात हे स्पष्ट होणार आहे.

कुडाळ : जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजले असून रणसंग्राम सुरू झाला आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत बऱ्याच प्रभागात काटे की टक्कर अपेक्षित आहे. नगरपंचायतमध्ये १७ जागांपैकी १३ जागांसाठी एकूण ४७ उमेदवार पात्र ठरले आहेत; मात्र मुख्य निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशीच असेल. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. १३ ला काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होते की स्वबळावर निवडणूक लढवितात हे स्पष्ट होणार आहे. बंडखोरी करणारे निष्ठावंत भाजपचे उमेदवार काय निर्णय घेतात? हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागांसाठी ४७ उमेदवार नगरपंचायत निवडणुक रिंगणात आहेत. प्रभाग १ कविलकाटे ः सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. याठिकाणी शिवसेना व भाजपमध्ये खरी लढत आहे. याठिकाणी पूर्वी महेंद्र वेंगुर्लेकर हे नागरीकांचा मागास प्रवर्गमधून निवडून आले होते. आता ज्योती जळवी या शिवसेनेतून तर सखू आकेरकर या भाजपमधून एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडून रंजना जळवी रिंगणात आहेत.

प्रभाग २ भैरवाडीमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडले असून या ठिकाणी शिवसेनेकडून अनुजा राऊळ तर भाजपकडून नयना मांजरेकर यांच्यात खरी लढत असली तरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने माजी नगराध्यक्ष ओंकार तेली किंग मेकर आहेत. त्यांनी आपल्या प्रभागात केलेली विकासकामे, राबविलेले विविध सामाजिक उपक्रम ही त्यांच्या मांजरेकर उमेदवार यांच्यासाठी निश्चितच झुकते माप आहे. काँग्रेसने येथून माजी पंचायत समिती सदस्य पूजा पेडणेकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. प्रभाग ४ बाजारपेठ प्रभागातून शिवसेनेतर्फे श्रुती व वर्दम भाजपतर्फे रेखा काणेकर यांनी उमेदवारी भरली आहे तर भाजपच्या महिला शहराध्यक्ष मृण्मयी धुरी यांनी याठिकाणी बंडखोरी करत भाजप उमेदवाराला आव्हान दिले आहे. या ठिकाणी काँग्रेसमधून सोनल सावंत या रिंगणात आहेत. बंडखोरीचा फायदा सोनल सावंत कशाप्रकारे करून घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग क्रमांक पाच कुडाळेश्वरवाडी हा प्रभाग सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला.

राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे
महाआघाडीचं ठरलं! सेना 8, राष्ट्रवादी-काँग्रेस 5, अपक्षासाठी 1 जागा

भाजपने या ठिकाणी युवा समाजसेवक अभिषेक गावडेसारखा उमेदवार दिला आहे. खरे म्हणजे अभिषेक गावडे हे संजय पडते यांचे यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जातात तर शिवसेनेने त्यांच्यासमोर प्रवीण राऊळ नवखा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे तर काँग्रेसने रोहन काणेकर यांना उमेदवारी दिली. याच प्रभागात मनसेनेही या निवडणूक रिंगणात उतरत रमाकांत नाईक यांना आखाड्यात उतरवले आहे. याठिकाणी भाजपचे विद्यमान नगरसेवक सुनील बांदेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रभाग ६ या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे यांचे निकटवर्ती आणि भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या पत्नी प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर प्राजक्ता यांची काकी आणि विद्यमान नगरसेवक जीवन बांदेकर यांच्या पत्नी देविका बांदेकर या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. या ठिकाणी काकी-पुतणी अशी लढत पहावयास मिळणार आहे. कारण या ठिकाणी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत यांनी या ठिकाणी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही लढत निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून शुभांगी काळसेकर यादेखील निवडणूक आखाड्यात आहेत; पण खरी लढत तिरंगी म्हणावी लागेल. प्रभाग क्रमांक सात आंबेडकरनगर या ठिकाणाहून पत्रकार तथा ॲड. विलास कुडाळकर हे भाजपतर्फे तर शिवसेनेतर्फे भूषण कुडाळकर यांच्यात लढत होणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणाहून डॉ. मयूर शारबिद्रे हे निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.

प्रभाग क्रमांक आठ मजिद मोहल्ला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. याठिकाणी भाजपतर्फे रेवती राणे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मानसी सावंत यांच्यात लढत होणार आहे तर काँग्रेसतर्फे आफ्रीन करोल यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग ९ नाबरवाडी हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्या ठिकाणी शिवसेना व भाजप दोघातच लढत होणार आहे. शिवसेनेतर्फे विद्यमान नगरसेविका श्रेया गवंडे तर भाजपतर्फे विद्यमान नगरसेविका साक्षी सावंत यांच्यात ती लढत होणार आहे. दोन नगरसेवकांमधील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. प्रभाग ११ वाघसावंतटेंब गणेश नगर हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे.

राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे
"बोलघेवड्या आव्हाडांना बहुजनांच्या पोरांशी देणं घेणं नाही"

शिवसेनेतर्फे गुरुनाथ गडकर तर राजीव कुडाळकर असून रंगत आणली आहे. प्रभाग १३ श्रीरामवाडीमधून भाजपतर्फे तेजस्विनी वैद्य यांनी या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवसेनेतर्फे विद्यमान नगरसेवक सचिन काळप यांच्या सौ. सई काळप यांनी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुडाळच्या माजी पंचायत समिती सभापती शिल्पा घुर्ये यांनी देखील या प्रभागातून अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसतर्फे विमल राऊळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रभाग क्रमांक १४ अभिनवनगरमधून (सर्वसाधारण प्रभाग) विद्यमान नगरसेविका प्रज्ञा राणे यांनी भाजपतर्फे आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी उमेदवारी दाखल केली आहे तर काँग्रेसतर्फे केतन पडते यांनी उडी घेत रंगत निर्माण केली आहे. प्रभाग १५ कुंभारवाडी येथून कुडाळ शहर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत राणे यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे उदय मांजरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसतर्फे विद्यमान नगरसेवक गणेश भोगटे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे
MHADA चा पेपर फोडण्याचा प्रयत्न, तिघांना पुण्यातून अटक

काका कुडाळकरांची उमेदवारी लक्षवेधी

प्रभाग क्रमांक १२ मध्ये विद्यमान भाजपच्या नगरसेविका संध्या तेरसे या प्रभागातून निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या प्रभागात वेधले आहे. काँग्रेसतर्फे अरुण गिरकर यांना उमेदवारी दाखल केली आहे. ही लढत दुरंगी असून चुरशीची अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.