संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना पुण्यात आणणार?

या हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
mla nitesh rane
mla nitesh rane sakal
Updated on

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची अधिक चौकशीसाठी नितेश राणे यांना पुणे येथे आणले जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या नितेश राणे यांना बुधवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

mla nitesh rane
नितेश राणे तुरुंगात पुस्तक वाचून वेळ घालवतायत? फोटो होतोय व्हायरलं

संतोष परब हल्ला प्रकरणी कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. तत्पूर्वी नितेश राणे बुधवारी सकाळी कणकवली जिल्हा न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद सुरु होता. संध्याकाळी ६ वाजता कोर्टाची वेळ संपण्यापूर्वी कोर्टानं सरकारी वकिलांचा युक्तीवाद मान्य करुन त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रदीप धरत यांनी सरकाच्यावतीनं नितेश राणे यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. (Nitesh Rane the court sentenced him to two days in police custody)

mla nitesh rane
मुंबईकरांची वाट लावणारा अर्थसंकल्प; भाजप नेते भातखळकरांची टीका

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर थेटपणे संशयाची सुई आली होती. पोलीस तपासातही त्यात पुरावे सापडल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. अज्ञातवासात राहून जिल्हा सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तरीही त्यांना पुन्हा एकदा कणकवलीच्या मॅजेस्टेटकडेच शरण येण्याची वेळ आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.