Uddhav Thackeray Mahad Rally: बारसूबाबतचं 'हे' सत्य का सांगितलं जात नाही; ठाकरेंचा CM शिंदेंना सवाल

आपल्याकडून पत्र कुठल्या परिस्थितीत लिहिलं गेलं याबाबत उद्धव ठाकरेंनी खुलासा केला.
Uddhav Thackeray Mahad Rally: बारसूबाबतचं 'हे' सत्य का सांगितलं जात नाही; ठाकरेंचा CM शिंदेंना सवाल
Updated on

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज कोकणातील महाड इथं पार पडली. यावेळी त्यांनी बारसू इथल्या रिफायनरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपण बारसूला प्रकल्प का हालवला? कुठल्या परिस्थितीत पत्र लिहिलं गेलं? याबाबत त्यांनी सभेत खुलासा केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "हे नागोबा तिथं बसलेत मालक बनून, त्यांना माहिती होतं की प्रकल्प इथं होणारच आहे. मी मुख्यमंत्री असताना ठरवलं होतं की रिफायनरी नाणारला होऊ देणार नाही. पण मला दिल्लीतून काही फोन आले हे गद्दार आत्ता तिथे गेले आहेत तेच सांगत होते की, हा मोठा प्रकल्प आहे. पण मी त्यांना सांगितलं की गुजरातला जाऊ द्या.

पण त्यांनी सांगितलं की तिकडं आता कोणाचा विरोध नाही. तशा काही वस्त्या नाहीत. गावं नाहीत. ओसाड जमीन आहेत, त्यानंतर माझ्याकडून पत्र दिलं गेलं. पण मला आता अशी शंका येते की हा सर्व सिक्वेन्स बघितला की आपलं सरकार पाडलं आणि तिकडनं संमती आली असणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर सडकून टीका केली.

मी ठरवलं होतं की, अंतिम मंजुरी मी स्वतः तिथं जाईन तिथल्या लोकांशी बोलेन त्या कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, जनतेला विचारेन तुम्हाला हवं आहे की नाही. हो बोलले तर प्रकल्प येईल नाही म्हटलं तर गेट आऊट. मग हे का नाही सांगितलं जात. पण आज मी बारसूत गेल्यानंतर बघितलं की संपूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दर बारसूत उतरवलं आहे. तिथं घराघरात पोलीस आहेत. एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर चीन तरी थांबला असता, अशा शब्दांत यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्र्यांवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.