मकरंद अनासपुरेंच्या ''ओवा'' चित्रपटाचे ओरी त शुटिंग

मकरंद अनासपुरेंच्या ''ओवा'' चित्रपटाचे ओरी त शुटिंग

स्थानिक कलाकारही चमकणार ; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी
Published on

जाकादेवी: मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी आणि संवेदनशील अभिनेता म्हणून परिचित असलेले मकरंद अनासपुरे यांच्या कौटुंबिक विषयावर आधारित असलेल्या ओवा या चित्रपटाचे शूटिंग रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावात सुरु आहे. हे शुटिंग पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. या चित्रपटामुळे ओरी गाव कानाकोपऱ्यात पोहचणार आहे.

ओरी गावात गोपाळ देसाई यांच्या घरामध्ये या चित्रपटाचे काही प्रसंग चित्रीत केले जाणार आहेत. तर काही प्रसंग चित्रीत करण्यासाठी जाकादेवी परिसरातील जागा निश्चित केल्या आहेत. अभिनेते अनासपुरे यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण नियोजित असून त्यांची टीम ग्रामस्थांच्या संपर्कात होती. अभिनेते अनासपुरे यांनीही रसिकांबरोबर संवाद साधल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अनेकांना अनुभवायला मिळत आहेत.

ओरी गावात चित्रीकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शैक्षणिक, सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक, नाट्य व सिनेमा सृष्टीतील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी देसाई यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. भेटायला आलेल्या सर्वसामान्य रसिकांना अनासपुरे यांनी आपलेसे केले. दिग्दर्शक, अभिनेता असे वलय विसरुन ते सर्वाशी मनमोकळेपणाने संवाद साधत होते.

विनोदी आणि संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. चित्रीकरणासाठी ओरी गावाची निवड केल्याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत समाधान व्यक्त होत आहे.


याबाबत अभिनेते अनासपुरे यांनी ग्रामस्थांपूढे आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, कोकणातील स्थानिक कलाकार नाटक व चित्रपटात येण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना सहकार्य करण्याचा मानस आहे.

ओवा या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या आवडीप्रमाणे काम देण्याचा विचार आहे. जाकादेवी हायस्कूलच्या काही विद्यार्थ्यांना या चित्रपटात संधी दिली आहे. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका मी साकारल्या आहेत.

स्थानिक कलाकारांना संधी देणार
मी कोकणातील असून येथील निसर्गाविषयी प्रचंड ओढ आहे. त्यामुळे माझ्या ओवा मराठी चित्रपटासाठी ओरीसारख्या निसर्गाच्या सान्निध्यातील गावात शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. याचा मला खूप आनंद वाटतो. चित्रपट निर्मितीसाठी येथील ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. चित्रपटाच्या आशयानुसार अनेक प्रसंग साकारताना स्थानिक कलाकारांना संधी दिली जात आहे, असे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या वेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()