नो डेव्हलपमेंट झोन नडले; इतरांचे धाबे दणाणले
दाभोळ : मुरूड(murud) येथील साई रिसॉर्टला(sai resort) केंद्र शासनाच्या(central government) वन व पर्यावरण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे या रिसॉर्ट लगतच्या अन्य हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, साई रिसॉर्टला दिलेली नोटीस ही माझ्या तक्रारीवरूनच केली जात असलेली कारवाई आहे, असा दावा माजी खासदार किरीट सोमय्या(kirit somiya) यांनी ट्विटरवर केला.मुरुड येथे सीआरझेड कायद्याचा (crz act)भंग करून १० हून अधिक रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोनमधील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आता या रिसॉर्टचे मालक नोटिसीला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दापोली मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर दोन रिसॉर्ट सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधली असल्याचे म्हटले आहे, असे श्री. सोमय्या यांनी सांगितले; मात्र देण्यात आलेल्या या नोटीसमध्ये रिसॉर्ट मालकाचे नाव नाही. हे बांधकाम सीआरझेड सीमेच्या आत बांधले असल्याने या संदर्भातील नोटीस वन व पर्यावरण मंत्रालयाने १७ डिसेंबर २०२१ ला पाठवली असल्याने खळबळ उडाली आहे. नोटीस मिळाल्यावर १५ दिवसांत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. मुरुड येथे राज्यातील अनेकांनी जागा घेऊन रिसॉर्ट बांधली आहेत. आता ही रिसॉर्ट श्री. सोमय्या यांच्या रडारवर आलेली आहेत.
मुरुड येथील साई रिसॉर्ट आपल्या मालकीचे नाही. सदर जागा आपण सदानंद कदम यांना विकली असून किरीट सोमय्या आपली तसेच सरकारची बदनामी करत असून आपण त्यांच्या विरोधात १ कोटीचा बदनामीचा खटला भरला असून एकतर सोमय्या यांनी आपली माफी मागावी किंवा १ कोटी रुपये द्यावेत.
अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी
दोन बड्या राजकीय नेत्यांच्या वादात स्थानिकांनी कर्ज काढून आपला उदरनिर्वाह होण्यासाठी पर्यटकांसाठी खोल्या बांधल्या असून, भविष्यात या प्रकरणामुळे स्थानिकांनाही त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे शासनाने स्थानिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
विराज खोत, मुरुड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.