सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित होते. भाषणादरम्यान आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम एकत्र मिळून काम केलं पाहिजे. विकासाच्या कामात राजकीय जोडे नकोत - उद्धव ठाकरे
बोलायचं नव्हतं पण आज नाईलाजास्तव बोलावं लागलं - उद्धव ठाकरे
कोकणची जनता डोळे मिटून शांत राहत नाही - राणेंना प्रत्युत्तर
पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, ठाकरेंचा खोचक टोला
खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं - उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग किल्ला छ. शिवाजी महाराजांनी बांधलाय नाहीतर आणि कोणतरी म्हणेल मी बांधला - ठाकरेंचा राणेंना टोला
विमानतळांबाबत शिंदे तळमळीनं बोलत होते. - उद्धव ठाकरे
तळमळीनं बोलणं वेगळं, मळमळीनं बोलणं वेगळं. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं - ठाकरेंचा राणेंना खोचक टोला
गोव्यापेक्षा कोकण काकणभर सरसच - उद्धव ठाकरे
आजचा दिवस आदळआपट करण्याचा नव्हे आनंदाचा क्षण - उद्धव ठाकरे
कोणी काय केलं, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. - उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला
मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करतानाच राणे समर्थकांनी नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाषणाला केली मराठीतून सुरुवात
विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा, राणेंचा टोमणावजा सल्ला
आमचं भागवा आणि काम सुरु करा, अशी भूमिका कुणी घेतली - राणेंचा मंचावर सवाल
गोवा हायवेच्या कामात कंत्राटदारांना कोण अडवतं - राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
विमानतळावर आल्यावर खड्डे पाहायचे का? - राणे
लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणाला तरी नेमा - राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री - नारायण राणे
2009 मध्ये आंदोलन करणारे मंचावर उपस्थित - राणेंनी केला प्रहार
कोकणच्या विकासाचं श्रेय बाळासाहेबांचं - राणे
इथला विकास कुणी केला हे लोकं सांगतील - राणे
इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईतच जात होती. मुंबईवर सिंधुदुर्ग जिल्हा अवलंबून होता - राणे
नारायण राणे यांना आठवले बाळासाहेब ठाकरे... सांगितला राजकीय किस्सा.. बाळासाहेबांनी मला इथं उभं राहण्यास सांगितलं. इथं कोणताही विकास नव्हता. पिण्याचे पाणी नव्हते, रस्ते नव्हते, वीज नव्हती. लोक आंधारात राहायचे. शैक्षणिक आवस्थाही बिकट होती. - राणे
मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री कानाजवळ काहीतरी बोलले - राणे
राजकारण करु नये असं वाटत होतं. - राणे
माझ्या जिवनातील आनंदचा क्षण - नारायण राणे
सिंधुदुर्गात आली विकासाची अंधी म्हणून मला मिळाली इथं येण्याची संधी - रामदास आठवले
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आले एकत्र मला आठवले युतीचे गाणे - रामदास आठवले
सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान, कारण मुंबईवरुन आलेय विमान - रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून भाषणाला केली सुरुवात
विमानतळाच्या दोन्ही बाजूला साडेतीन किलोमीटरचा रन-वे होऊ शकतो - अजित पवार
इथून कुडाळ 24 किलोमीटर आहे मालवण बारा किलोमीटर आहे त्यामुळे कोकणच्या विकासाची वाटचाल निश्चितपणे सुरू होणार - अजित पवार
कोकण सर्वांना आकर्षित करतं - अजित पवार
कोकणतीच गोष्ट एकट्याने होत नसते, सर्वांच्या प्रयत्नानेच होते - अजित पवारांचा राणेंना टोला
जगातून गोव्याला लोक येतात, गोव्या इतकेच तोडीचे समुद्र किनारे कोकणाला लाभले आहेत. - अजित पवार
कोकणात पर्यटनाला मोठा वाव, रोजगारही उपलब्ध होतील - बाळासाहेब थोरात
निसर्गानं कोकणाला खूप मोठी देणगी दिली आहे. इथं पर्यटनाला सर्वाधिक वाव मिळेल - बाळासाहेब थोरात
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली
जगाला कोकण काय दे दाखवू शकतो - आदित्य ठाकरे
जगभरातून पर्यटन आणायचे असतील तर काय करावं ? , पंचतारांकित हॉटेल आणावे लागतील. पुढच्या 2 वर्षांत चांगले हॉटेल येतील. समारीन , बिच पॉलिसी आहेत. देशाचा फायदा आहे. महाराष्ट्र म्हणून अग्रेसर राहिलाय - आदित्य ठाकरे
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पर्यटन कसं वाढू शकेल यावर लक्ष केंद्रीत करत आहोत - आदित्य ठाकरे
कोकण जगप्रसिद्ध आहेच. पण जगभरातून लोकं इथं कसे येतील यासाठी काम करणार - आदित्य ठाकरे
कोकणवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण - सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला बोर्डिंग पास देण्यात आला.
उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन@MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoSindhudurg @AjitPawarSpeaks @bb_thorat @satejp @meudaysamant @AAI_Official pic.twitter.com/D7dQ2hTSP3
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) October 9, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री कोनशिलाच्या अनावरणावेळी समोरासमोर आले. दोघांनीही बोलणं टाळलं.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचं अनावरण, नारायण राणेंसह दिग्गजांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपी विमानतळावर दाखल. पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांचं केलं स्वागत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला होणार सुरुवात
पहिलं प्रवासी विमाव चिपी विमानतळावर आले असून सुभाष देसाई, अरविंद सांवत, दादा भुसे असे सर्व मान्यवर दाखल झाले आहे. सुरुवातील शिवसेनेचे नेते पोहोचले.
विमानतळ लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सिंधुदुर्गनगरीत आगमन. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून सर्वांचे स्वागत. pic.twitter.com/j5FhpjTKEI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 9, 2021
मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी १.०० वाजता #सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे चिपी-परुळे, तालुका वेंगुर्ला येथील ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. pic.twitter.com/nG1buuAE43
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) October 9, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चिपी विमानतळावर दाखल
Chipi Airport : नारायण राणे, निलेश राणे, दिपक केसरकर, अरविंद सावंत यांचा एकाच विमानातून प्रवास pic.twitter.com/KEFcOxgHsN
— SakalMedia (@SakalMediaNews) October 9, 2021
अशा असणार फेऱ्या ः
* रोज मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी फेरी
* या विमानतळाचा एसडीडब्ल्यू असा कोड निश्चित
* या फेरीसाठी ७० आसनी एटीआर ७२ ६०० विमान तैनात
* मुंबईहून ९१६६१ विमान सिंधुदुर्गाकडे सुटण्याची वेळ सकाळी ११.३५ आणि पोहोचण्याची वेळ दुपारी १.००
* सिंधुदुर्गातून ९१६६२ विमान सुटण्याची वेळ १.२५ आणि मुंबईत पोहोचण्याची वेळ २.५०
"चिपी विमानतळातचं (chipi airport) नारायण राणेंचं (narayan rane) स्वप्न पूर्ण होत असताना, त्यावेळी बाळासाहेबांच्या मुलाची व्यासपीठावरील उपस्थिती हा बाळासाहेबांचाच आशिर्वाद आहे. आमच्या कुटुंबाचं बाळासाहेबांबरोबर वेगळ नातं आहे" असं कणकवलीचे आमदार नितेश राणे (nitesh rane) म्हणाले. आज चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
नारायण राणेंना जशास तसे उत्तर देऊ - अरविंद सावंत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विमानातून काही शिवसैनिकांचा प्रवास.
नारायण राणे, निलेश राणे, दिपक केसरकर, अरविंद सावंत एकाच विमानातून रवाना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गला रवाना
असे आहे विमानतळ
* विमानतळाचे नाव : सिंधुदुर्ग विमानतळ
* विकासक कंपनी : मे. आय. आर. बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि.
* डी. बी. एफ. ओ. तत्वानुसार चालवायचा कालावधी : ९५ वर्षे.
* प्रकल्पाचा अंदाजे खर्च : ५२० कोटी
* प्रकल्पासाठी अधिसुचीत जागा : २८६.३८ हेक्टर
* ताब्यात असलेली जागा : २७१.८६ हेक्टर
* एमआयडीसीने विमानतळ सुविधांसाठी केलेला खर्च : १३.७२ कोटी
* धावपट्टीची लांबी : २५०० मीटर बाय ४५ मीटर
* विमान उड्डाण क्षमता : बोईंग ७३७, एअरबस ३२०
* विमानतळ वाहतूक नियंत्रण टॉवर : २७७ चौरस मीटर
* प्रशासकीय इमारत : १,०३५ चौरस मीटर
* अग्निशमक केंद्र : ८८५ चौरस मिटर
* तांत्रीक इमारत : ९४६१ चौरस मिटर
* विमान पार्कींग व्यवस्था : ४ सी प्रकारची तीन विमाने
* प्रवासी सुविधा इमारतीची क्षमता : ४०० प्रवासी
केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गला रवाना
उद्धव ठाकरे समोर आले म्हणून काय झालं? मुख्यमंत्री आहेत म्हटल्यावर आम्ही त्यांचं स्वागत करु. तिथे कोणत्याही प्रकारचं राजकारण होणार नाही, कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. आमच्या खुर्च्या शेजारी असणं ही चांगली गोष्ट, आनंदाचा क्षण आहे. - नारायण राणे
जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार,
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया दुपारी दोन वाजता राजीव गांधी भवनातून झेंडा दाखवून या विमानतळाचं व्हर्च्युअली उद्घाटन करतील.
त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपी येथे या विमानतळाचं प्रत्यक्ष हजर राहून लोकार्पण करतील.
विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असून चारशे ते पाचशे पोलिस तैनात आहेत. कार्यक्रमाला फक्त दोनशे ते अडीचशे जणांनाच परवानगी आहे.
कोण कुठे बसणार?
आज तब्बल 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण होऊन त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात ते एकत्र आल्यावर ते एकमेकांशी बोलणार का, बोलले तर काय बोलणार? मंचावरची त्यांची देहबोली कशी असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खूर्ची तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूर्ची असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.