सिंधुदुर्ग : पीक विमा योजनेत सहभागाचे आवाहन

कृषी अधिकारी ३१ जुलैपर्यंत मुदत
 crop insurance scheme
crop insurance schemesakal
Updated on

ओरोस : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२२-२३ मधील शेती संरक्षणासाठी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिवेकर यांनी केले आहे. ३१ जुलैपर्यंत विमा रक्कम भरण्याची मुदत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ करिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे शासनाने जबाबदारी दिली आहे. भातशेतीसाठी प्रति हेक्टरी १ हजार ३५ रुपये विमा रक्कम भरायची आहे. नुकसानी झाल्यास विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ५१ हजार ७६० रुपये प्रति हेक्टरी रक्कम मिळणार आहे. तर नाचणीसाठी प्रति हेक्टरी ४०० रुपये विमा रक्कम भरायची असून, नुकसानी झाल्यास प्रति हेक्टरी २० हजार रुपये मदत मिळणार आहे. पीक पेरणीपासून पीक कापणीपर्यंत हे विमा संरक्षण राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, वीज, पाऊस, गारपीट आदी कारणांसाठी ही मदत मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यात किमान ५०० शेतकऱ्यांनी विमा उतरविणे गरजेचे असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले.

विमा रकमचे अद्याप वाटप

खरीप हंगाम २०२०-२१ या गतवर्षी जिल्ह्यातील आठ हजार १६० शेतकऱ्यांनी विमा उतरवित शेतकऱ्यांनी शेती संरक्षित केली होती. त्यातील दोन हजार ८७४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. एक हजार २७६ हेक्टर शेतीला नुकसान पोहोचले होते. त्यांना ९० लाख ९ हजार रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यातील काही बाधित शेतकऱ्यांना नुकसान रक्कम अद्याप मिळालेली नसून वाटप सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.