सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!
Updated on
Summary

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. यावेळी राज्यासाठी २५२ कोटींची मदत जाहीर करण्यात आली.

ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळ (cyclone tauktae) नुकसानीच्या मदतीसाठी राज्य शासनाने २५२ कोटी रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ४० कोटी १८ लाख ४२ हजार ४०० रुपये एवढी मदत (relief fund) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) बाधित व्यक्तींना मिळणार आहे. शासकीय नुकसानीची मदत वेगळी दिली जाणार आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत केली असती तर केवळ १६ कोटी ६० लाख ५८ हजार ३०० रुपये एवढीच मदत मिळाली असती; परंतु मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) निसर्ग वादळाप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेतल्याने ही वाढीव मदत मिळाली आहे. पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष मदतवाटप सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला ३० कोटी ७२ लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. (sindhudurg district will get relief fund of rs 40 crore due to the damage caused by cyclone tauktae)

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार! ‘सिव्हिल’मधूनच इंजेक्शन गायब

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. यावेळी राज्यासाठी २५२ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. याबाबत शासन आदेश जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला यातील किती मदत मिळणार आहे, याची माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले, त्यावेळी महाविकास आघाडी सरकार तौक्ते बाधितांच्या पाठीशी असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राच्या एनडीआरएफ व एसडीआरएफचे निकष डावलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस मदत जाहीर केली आहे.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!
सांगलीतील ३३ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत

श्री. सामंत म्हणाले, ‘कोकण किनारपट्टीवरील व मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चार सदस्य समिती नियुक्त केली आहे. मुंबई विद्यापीठ व शासनाचा हा संयुक्त प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत समिती जिल्ह्यात येऊन महाविद्यालयांच्या नुकसानीचा आढावा घेईल. त्याचा अहवाल कुलगुरुंकडे सादर करेल. त्यानंतर भरघोस मदत दिली जाईल.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!
शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती

पंचनामे सुधारण्याचे जिल्हधिकाऱ्यांना अधिकार

जिल्ह्यातील कृषी, पशुनुकसानीचे अनेक पंचनामे झाले नसल्यामुळे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘झालेल्या पंचनाम्यात सुधारणा करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना सहकार्य करावे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात येईल.’’

अशी मिळणार मदत

- वादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना- प्रत्येकी चार लाख

- ३६ घरांची पूर्ण पडझड - ५४ लाख

- ९०३४ घरांची अंशतः पडझड - १३ कोटी ५५ लाख १० हजार

- १९ झोपड्यांची हानी - २ लाख ८५ हजार

- ८८४ गोठे - १८ लाख ५४ हजार ४००

- १२० बोटींची अंशतः हानी - १२ लाख

- पूर्ण नष्ट झालेल्या बोटींसाठी - १४ लाख

- १२५३ नादुरुस्त जाळी - २६ लाख ३१ हजार ३००

- १५, ६६९ जाळी पूर्ण नष्ट - ७ कोटी ८३ लाख ४५ हजार

- पिकांचे नुकसान- ५० हजार प्रति हेक्‍टरी

- पिकांच्या नुकसानीपोटी एकूण भरपाई - १६ कोटी ८१ लाख

(sindhudurg district will get relief fund of rs 40 crore due to the damage caused by cyclone tauktae)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.